Karjat News: कर्जत तालुक्यातील भातशेतीला पावसाचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अनेक ठिकाणी पिके आडवी होऊन सडली असून, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांमधून सरसकट पंचनामे करण्याची मागणी जोर धरत आहे..कर्जत तालुक्यात सतत पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे भातशेतीचे पीक पूर्णपणे हातातून गेले आहे. अनेक शेतकऱ्यांची वर्षभराची मेहनत पाण्यात गेली आहे. दसऱ्यापासून सुरू झालेल्या पावसाने भातपीक आडवे केले होते, तर कापणीवेळीच परतीच्या पावसाने उरलेसुरलेल्या पिकाचे नुकसान केले..Cotton Crop Loss: वेचणीला आलेला कापूस भिजला.त्यामुळे एकरी किमान ५०,००० रुपयांची नुकसानभरपाई द्यावी. तसेच भातपिकाला प्रति क्विंटल ४,००० रुपये हमीभाव देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.लहरी निसर्गामुळे बसलेला आघात ओळखून महसूल प्रशासन आणि कृषी विभाग तत्परतेने कामाला लागला आहे..Cotton Crop Loss: परभणीत दोन लाख हेक्टरवरील कपाशीला फटका.याच अनुषंगाने सोमवार (ता. २७) तातडीची बैठक घेण्यात आली आहे. या वेळी ३० ऑक्टोबरपर्यंत तालुक्यातील पंचनामे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. शेतकऱ्यांना सरसकट भातशेतीच्या नुकसानीनुसार नुकसानभरपाई दिली जाईल, असेही कृषी अधिकारी राजाराम शिंदे यांनी सांगितले..पाहणी केलेली गावे - २०८ हेक्टर नुकसान झालेले क्षेत्र - १७१.८६ झालेले पंचनामे - ४५१ .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.