Rain Crop Loss : अवकाळी पावसाची साडेचार हजार हेक्टरवरील पिकांना बाधा

May Rain Crop Damage : जिल्ह्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या मॉन्सूनपूर्व जोरदार पावसामुळे फळपिकांना मोठा दणका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Dharashiv News : मे महिन्यात झालेल्या मॉन्सूनपूर्व अर्थात अवकाळी पावसाची बाधा जिल्ह्यातील चार हजार ६९४ हेक्टरला बसली असून, यात बागायती व फळपिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाल्याची माहिती प्रशासनाने केलेल्या पंचनाम्यातून पुढे आली आहे.

यामुळे बाधित दहा हजार ८४६ शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सरकारकडे आठ कोटी ३७ लाख रुपये निधीची मागणी केली आहे. लवकरच हा निधी मंजूर होऊन भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल, अशी आशा प्रशासनाला आहे.

जिल्ह्यात मे महिन्यात वादळी वाऱ्यांसह झालेल्या मॉन्सूनपूर्व जोरदार पावसामुळे फळपिकांना मोठा दणका बसलेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सर्वाधिक फटका आंबा फळबागांना बसलेला आहे. फळे ऐन काढणीला आलेली असताना वादळी वारे, पाऊस झाल्याने आंब्यांची मोठी गळ झाली. बागांचेही नुकसान झाले. शेतकऱ्यांचे वर्षभराचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाई देण्यासाठी प्रयत्न

हे नुकसान भरून निघणे शक्य नसले तरी सरकारकडून काहीसा आधार मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे. या नुकसानीचे पंचनामे प्रशासनाने केले असून अंतिम अहवाल सरकारला सादर केला आहे. यात तीन हजार ९८५ हेक्टर बागायती पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या मदतीसाठी प्रति हेक्टरी १७ हजार रुपयांप्रमाणे ६ कोटी ७७ लाख ४६ हजार रुपये निधीची मागणी करण्यात आली आहे.

यासोबत ७०९ हेक्टर फळपिकांचेही ३३ टक्केपेक्षाही अधिक नुकसान झाले असून, या फळबागायतदार शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी हेक्टरी २२ हजार ५०० रुपयांप्रमाणे १ कोटी ५९ लाख ५३ हजार ४०० रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीकनुकसान अनुदान वाटपाची पडताळणी सुरू

तालुकानिहाय नुकसान स्थिती..

अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका तुळजापूर तालुक्याला बसला आहे. तालुक्यातील २ हजार ९६० शेतकऱ्यांच्या एक हजार ६१ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. त्यापाठोपाठ धाराशिव तालुक्यातील एक हजार ६८२ शेतकऱ्यांच्या ९१२.५४ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. याशिवाय भूम, परांडा, वाशी या जिल्ह्यांच्या उत्तर भागातील तालुक्यांना पावसाने मोठा दणका दिला आहे.

वाशी तालुक्यात १ हजार ७६० शेतकऱ्यांच्या ६४०.७५ हेक्टर, परंड्यातील १ हजार २७६ शेतकऱ्यांच्या ६७३ हेक्टर, तर भूम तालुक्यातील १ हजार ३८७ शेतकऱ्यांच्या ५४४ हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. तसेच, कळंब तालुक्यातील ९६१ शेतकऱ्यांच्या ४५१.७१ हेक्टर, लोहाऱ्यातील ४०२ शेतकऱ्यांच्या १७४ हेक्टर, तर उमरगा तालुक्यातील ४०८ शेतकऱ्यांच्या २३०.८० हेक्टर फळपिकांना फटका बसला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com