Pune News: रायगड जिल्ह्यात आज (ता.२७) मंगळवारी पहाटे अचानक (वळीवाचा) पाऊस झाला. पेण तालुक्यात या पावसामुळे नागरिकांची तसेच व्यावसायिकांची धावपळ उडाली. वाळत ठेवलेल्या गणेशमूर्ती आणि कच्च्या विटांचे नुकसान होण्याची भीती निर्माण झाली आहे. तसेच सध्या मोहोर येत असलेल्या आंबा पिकालाही या पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे. अनपेक्षित पावसामुळे शेतकरी आणि कारागीर चिंतेत पडले आहेत..पहाटेच्या पावसाने व्यावसायिकांची धावपळ…सोमवारी पेण परिसरात ढगाळ वातावरण होते, मात्र पावसाची शक्यता कमी होती. तरीही मंगळवारी पहाटे साडेपाचच्या सुमारास अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस पडू लागला. सुमारे अर्धा तास हा पाऊस सुरू होता. अचानक आलेल्या पावसामुळे वाळत ठेवलेल्या गणेशमूर्ती आणि कच्च्या विटा वाचवण्यासाठी व्यावसायिकांची चांगलीच धावपळ झाली. काही ठिकाणी विटा आणि मूर्तींचे नुकसान झाल्याची माहिती आहे..Unseasonal Rain: वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी.आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची भीती…या वळीवाच्या (मान्सूनपूर्व) पावसाचा सर्वाधिक फटका आंबा पिकाला बसण्याची शक्यता आहे. सध्या आंब्याला मोहोर येण्याचा काळ असून, पावसामुळे मोहोर गळण्याची भीती आहे. त्यामुळे फळधारणा कमी होऊ शकते. तसेच परागीकरण प्रक्रियेत अडथळा येण्याची शक्यता आहे..बुरशीजन्य रोगांचा धोका वाढण्याची शक्यता…पावसामुळे आंब्याच्या झाडांना नवी पालवी फुटू शकते, ज्यामुळे बुरशीजन्य रोग वाढण्याचा धोका बागायतदारांनी व्यक्त केला आहे. याचा परिणाम आंबा उत्पादनावर होऊ शकतो. पुढील काही दिवसांत हवामान कसे राहते, याकडे शेतकरी आणि व्यावसायिक लक्ष ठेवून आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.