Dharashiv News: अवेळी आणि शेवटच्या टप्प्यात अधिक पावसामुळे यंदा खरिप हंगामातील पिकाच्या उत्पन्नात मोठी घट होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. निसर्ग वेळोवेळी दगाफटका देत असल्याने शेतकऱ्यांनी मूग, उडिदाचे क्षेत्र मर्यादित ठेवले आहे. त्यात यंदा पिकाला अळी, किडीचा विळखा पडल्याने अन् शेवटी पावसात अडकल्याने उत्पन्नात कमालीची घट झाली आहे. आता उडीद, मुगाची काढण्याची लगबग सुरू झाली आहे, काही ठिकाणी राशीही सुरू असल्याने मिळणाऱ्या उत्पन्नात कमालीची घट झालेली दिसून येत आहे..तालुक्यात यंदा अवकाळी पावसाने चांगलीच हजेरी लावली होती. मृग नक्षत्रातही वेळेत पाऊस झाला; परंतु पेरणी करण्यासाठी रानं येत नसल्याने काही ठिकाणी पेरणीला विलंबही झाला. पेरणीनंतर पिके चांगल्या स्थितीत होती; मात्र पावसाने महिनाभर दडी मारल्याने पिकाने माना टाकायला सुरवात केली होती. त्यानंतर अधूनमधून झालेल्या हलक्या पावसामुळे पिकाच्या वाढीला थोडा आधार मिळाला. .Maharashtra Crop Loss: राज्यात ८ लाख ५१ हजार हेक्टरवर पिकांचे नुकसान.फुलधारणा, फळधारणेची स्थिती मजबूत होत असताना अळी, किडी व पाऊस झाल्याने नुकसान झाले. दरम्यान, यंदा वेळेवर पाऊस झाल्याने उडीद व मुगाची पेरणी वेळेत अन् गतवर्षीच्या तुलनेत वाढली होती. साधारणतः तूर, मूग व उडीद या कडधान्यांची २२ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली..दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून पाऊस थांबल्याने मूग, उडदाची काढणी सुरू झाली आहे. शेवटच्या टप्यात पावसाने जोर धरल्याने उडदाला फटका बसला. राशीच्या दरम्यान ओल, कच्चा अन् बुरशी सारख्या दाण्याचा भरणा दिसून येत आहे. पोषक वातावरणाअभावी निर्माण झालेल्या या प्रकाराने मालाला कमी भाव लागत आहे. .Moong Crop Loss: पावसाने खानदेशात मूग पिकाची हानी.हमीभावासाठी नोंदणी सुरू व्हावीआगोटी पेरणी झालेल्या उडीद, मुगाची स्थिती चांगली होती; मात्र शेवटच्या टप्यात पावसाची संततधार वाढल्याने शेंगा भिजल्या अन् त्याचा परिणाम आतील दाण्यांवर झाला. काही ठिकाणी चांगल्या प्रतीचे उडीद, मूग निघत आहे. मात्र, सद्यःस्थितीत अडत बाजारात उडदाला पाच ते सात हजार रुपये प्रति क्विंटल दर तर मुगाला सहा ते सात हजार रुपये प्रतिक्विंटल दर आहे..हा दर शासकीय हमीभावापेक्षा कमी आहे. उडिदाला हमीभाव प्रतिक्विंटल सात हजार आठशे, तर मुगाला आठ हजार ७६८ रुपये प्रतिक्विंटल भाव आहे. हमीभाव केंद्र सुरू होण्यासाठी आणखी अवधी असला तरी सद्यःस्थितीत त्याची नोंदणी सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे..‘खायापुरतचं पडतंय पदरात’आष्टा जहागीर येथील सुनील दगडू गायकवाड यांनी शेती व्यवसायाची विदारक स्थिती सांगितली. ‘आता पहिलेचा काळ रायला नायं, शेतीचं गणितच बिघडून गेल्या. सगळं संकरित झालंय. पावसाचा नेम राहिला नसल्यानं पीकही नीट येत नाय. कितीबी घाम गाळलं तरीबी खायापुरतचं पदरात पडतंय’ अशा शब्दात गायकवाड यांनी आपली व्यथा मांडली..पुन्हा पेरणीसाठी उसनवारी करावी लागतंय. यंदाचं खरिपाचं हंगाम पडतळ पडल नाही, दोन एकरात १२ ते १३ क्विंटल उडीद निघायचं, पण कधीबी पाऊस पडत असल्यानं सात ते आठ क्विंटलपर्यंत उत्पन्न मिळाले. शेतकऱ्यांचा प्रवास उलट्या दिसेने जात आहे. मायबाप सरकारनं शेतकऱ्यांच्या कष्टांची चीज करावी’, अशी हाक शेतकरी गायकवाड यांनी सरकारकडे दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.