सुनील चावकेसंसदेच्या अर्थसंकल्पी अधिवेशनातील गेल्या आठवड्यातील घडामोडी अकल्पित, ऐतिहासिक आणि वेगवान ठरल्या. जनतेने निवडून दिलेल्या सभागृहात कल्पनाही करता येणार नाही असे अराजक माजू शकते, असा इशारा खुद्द लोकसभा अध्यक्षांनीच देणे ही बाब गंभीर आहे. .अनिश्चित जागतिक आर्थिक आव्हानांना सामोरे जाताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पानंतर लोकसभेच्या कामकाजालाही अनिश्चिततेचे ग्रहण लागले. माजी लष्करप्रमुख मनोज नरवणे यांच्या ‘अप्रकाशित’ पुस्तकातील उतारे वाचून दाखवण्यास लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना मज्जाव करण्यात आल्यानंतर लोकसभेतील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्ताव चर्चेला नाट्यमय कलाटणी मिळाली. परिणामी पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही लोकसभेत भाषण करता आले नाही आणि संसदीय लोकशाहीची वाटचाल धूसर झाल्याचे चित्र निर्माण झाले..Parliament Budget Session 2026: लोकसभेतील काँग्रेसचे आठ खासदार निलंबित; राहुल गांधीना बोलू न देण्यावरून गदारोळ.जे उचित वाटते ते करा‘‘आपल्याला राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित दोन-तीन ओळीच बोलायच्या आहेत. त्यात आपल्याला काय म्हणायचे आहे, ते सर्व काही उघड होईल. पण आपल्याला बोलू दिले जात नाही. माजी लष्करप्रमुख नरवणे पंतप्रधान मोदी आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याशी काय बोलले, हे आपण संसदेत सांगू इच्छितो. पण सरकार एवढे का घाबरले आहे ते कळत नाही,’’ असे राहुल गांधी यांचे म्हणणे आहे. पण त्यांना गोपनीयता बाळगता येत नाही. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या पक्षातील जुन्याजाणत्या नेत्यांवर त्यांचा विश्वास नाही. सत्ताधारी आघाडीला गाफिल ठेवून त्यांच्यावर धक्कातंत्राने हल्ला चढविण्याचे चातुर्य राहुल गांधी दाखवू शकलेले नाहीत. जनरल नरवणे यांचे पुस्तक डिसेंबर २०२३ मध्ये अनौपचारिक स्वरूपात बाजारात आले, तेव्हा त्याची राहुल गांधी आणि त्यांच्या सल्लागारांना कल्पनाही नव्हती..पण या पुस्तकाचा वृत्तांत एका मासिकात प्रसिद्ध झाल्यानंतर राहुल गांधी आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भारत-चीन सीमेवर असे काही घडल्याचा फेब्रुवारी २०२६ मध्ये शोध लागला. पंचवीस महिन्यांपासून अस्पष्ट स्वरूपात का होईना, या पुस्तकातील भारत-चीन लष्करी संघर्षाचा प्रसंग आणि त्यावरील पंतप्रधान मोदी यांनी ‘जे उचित वाटते ते करा’ ही भूमिका चर्चेत होती. राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या आरोपांचा प्रतिवाद करताना भाजपसाठी त्याच भूमिकेचा पुनरुच्चार करणे बऱ्यापैकी सोईचे होते. तरीही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हे ‘ओपन सिक्रेट’ उघड होऊ नये म्हणून लोकसभेत ऐनवेळी कामकाजाचे नियम बदलण्याचा प्रयत्न केला. मोदी सरकारवर हल्ला चढविण्यासाठी आपले निवेदन पूर्ण करून भाषणांती जनरल नरवणे यांच्या पुस्तकाचा दाखला देणे राहुल गांधींना शक्य होते. पण अपुऱ्या तयारीमुळे ते शक्य झाले नाही..Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?.‘एपस्टिन फाइल्स’मध्ये आतापर्यंत पंतप्रधान मोदी यांचा उल्लेख; तसेच त्यांचे केंद्रीय मंत्री हरदीपसिंह पुरी आणि एकेकाळचे निकटवर्ती उद्योगपती अनिल अंबानी यांची नावे आली आहेत. त्यांची नावे बघून विरोधक मोदी सरकारवर आरोप करायला उतावळे झाले आहेत. राहुल गांधी यांना सभागृहापुढे जे मांडायचे होते त्यापासून रोखण्यासाठी लोकसभाअध्यक्ष ओम बिर्ला यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. पण राहुल गांधी यांना जे मुद्दे उपस्थित करायचे होते, ते जगजाहीर झालेच. सभागृहात आरोप करायला राहुल गांधी उभे झाले की हाती सत्ता असूनही त्याचा प्रभावीपणाने वापर करण्याची समयसूचकता दाखविण्याचे भान सत्ताधारी गमावून बसतात. पूर्ण ताकद लावून राहुल गांधींना रोखताना तसेच झाले..घटनाक्रमाचा उत्तरार्धही रोचकया घटनाक्रमाचा उत्तरार्धही तितकाच रोचक ठरला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या अकरा वर्षांपासून न चुकता उत्तर देत आले आहेत. या वेळी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यालाच बोलण्यापासून रोखले तर पंतप्रधान मोदींचेही भाषण होऊ द्यायचे नाही, असे डावपेच काँग्रेसने आखले असावेत. शिवाय तोपर्यंत जनरल नरवणेंच्या पुस्तकाची प्रत राहुल गांधींच्या हाती लागली होती..Parliament Winter Session 2025: हिवाळी अधिवेशन २०२५: संसद पुढील अधिवेशन काळापर्यंत तहकूब; आठ महत्त्वाच्या विधेयकांना मंजुरी.पंतप्रधान लोकसभेत उत्तर द्यायला येतील, तेव्हा आपण त्यांच्या हाती पुस्तक ठेवू अशी घोषणा राहुल गांधी यांनी केली होती. त्यातच पंतप्रधान लोकसभेत भाषण देणारच नाहीत, असा दावाही त्यांनी केला. तो खरा ठरला. बुधवारी, पंतप्रधानांच्या लोकसभेतील भाषणाची वेळ झाली तेव्हा तीन-चार महिला सदस्य पंतप्रधानांच्या आसनाभोवती गोळा झाल्या. त्यामुळे सभागृहाचे कामकाज तत्काळ तहकूब करण्यात आले. सभागृहातील महिला सदस्यांपासून गंभीर इजा पोहोचण्याची गोपनीय सूचना मिळाल्यामुळे आपणच पंतप्रधानांना लोकसभेत भाषण देण्यापासून परावृत्त केल्याचे ओम बिर्ला यांनी जाहीर केले. त्यामुळे २००४ नंतर प्रथमच राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधान उत्तर देऊ शकले नाहीत. ‘पंतप्रधान संसदेतही सुरक्षित नाहीत’, असा संदेश देणारा ओम बिर्ला यांचा दावा अतिशय गंभीर आहे..लोकसभेत पंतप्रधानांपाशी पोहोचून त्यांच्यावर हल्ला चढविण्याची हिंमत करू पाहणाऱ्या त्या संशयित महिला सदस्य कोणत्या याची विरोधी पक्षांकडून ओम बिर्ला यांना विचारणा झाल्याशिवाय राहणार नाही. जेथील कामकाजाचे थेट प्रक्षेपण होते, अशा सभागृहात सर्वांदेखत पंतप्रधानांवर हल्ला चढविण्याची योजना आखणाऱ्या महिलासदस्य असल्या, तरी त्यांना अशा संभाव्य हल्ल्याचे गंभीर परिणाम भोगावे लागले असते. त्यांचे संसदसदस्यत्व संपुष्टात येऊन त्यांची राजकीय कारकीर्द तत्काळ संपुष्टात आली असती..अशा हल्ल्याची पूर्वकल्पना असलेल्या ओम बिर्ला यांना पंतप्रधान सभागृहात येण्यापूर्वीच त्या महिलांना निलंबित करता आले असते. हल्लेखोर सदस्यांना तुरुंगवासही भोगावा लागला असता. संसदेत गुन्हेगारी पार्श्वभूमीचे अनेक सदस्य असले, तरी एवढी जोखीम पत्करण्याचे धाडस आजवर कोणी केलेले नाही. कुठलाही अनुचित प्रकार टाळण्यासाठी लोकसभा अध्यक्षांना पंतप्रधानांच्या भोवती मार्शल तैनात करता आले असते. त्यामुळे लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेला पंतप्रधानांनी उत्तर देण्याची परंपरा अबाधित राहिली असती..अर्थात, जे लोकसभेत घडणार नव्हते, त्याची प्रचिती दुसऱ्या दिवशी राज्यसभेत आली. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणावर बहिष्कार घालून विरोधी पक्षांनी जोरदार घोषणाबाजीअंती राज्यसभेत सभात्याग केला आणि पंतप्रधान मोदी यांनी तब्बल ९८ मिनिटे भाषण केले. राज्यसभेच्या दुसऱ्याच अधिवेशनाला सामोरे जाताना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांनी सभागृहात नेहमी उडणारा गोंधळ संयमाने हाताळला. पण जनतेने निवडून दिलेल्या सभागृहात कल्पनाही करता येणार नाही असे अराजक माजू शकते, असा निर्वाळा खुद्द लोकसभा अध्यक्षांनीच देणे ही संसदीय लोकशाहीसाठी अनिष्ट खूण आहे.(लेखक ‘सकाळ’च्या नवी दिल्ली ब्यूरोचे प्रमुख आहेत.).ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.