Union Budget : हवामान बदलाचा फटका शेती क्षेत्राला सर्वाधिक फटका बसत आहे. त्यामुळे हवामानाच्या अचूक अंदाजाची गरज शेतकऱ्यांना अधिक आहे. या पार्श्वभूमीवर हवामानाचे निरीक्षण, हवामानाचे अचूक अंदाज आणि डेटा विश्लेषणाचे उद्दिष्ट ठेवून २०२६-२७ मिशन मौसमसाठी (मौसम अभियान) केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पात १ हजार ३४२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. २०२५-२६ च्या सुधारित ८४० कोटी रुपयांच्या तुलनेत ही वाढ मोठी असल्याचा दावा पृथ्वी विज्ञान मंत्रालयाने केला आहे..या अभियानात भांडवली खर्चासाठी ४८७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. मागील वर्षी १७७ कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली होती. यामध्ये नवीन मालमत्ता निर्मितीसाठी खर्च करण्यात येतो. तर या अभियानांतर्गत महसुली खर्चासाठी मागील वर्षी ६६२ कोटी रुपये तरतुद करण्यात आली होती. यंदाच्या अर्थसंकल्पात ती वाढवून ८५५ कोटी रुपये करण्यात आली आहे..Budget 2026 : अर्थसंकल्पामुळे बाजाराला उभारी मिळेल का ?.मौसम अभियान काय?या अभियानाच्या अंतर्गत अचूक हवामानाचा अंदाज देण्यासाठी क्षमता विकसित करण्यावर भर देण्यात येतो. यामध्ये हवामानचे निरीक्षण, अंदाज आणि डेटाचे विश्लेषण केले जाते. तसेच त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान निर्मितीसह उच्च कार्यक्षमता असलेल्या संगणन आणि प्रगत अशा मॉडलिंग तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो, असे पृथ्वी मंत्रालयाने सांगितले आहे..तर हवामानाचे निरीक्षणाबरोबरच अधिक अचूक अंदाजांसाठी रडार आणि उपग्रहांच्या समावेशासह कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर करण्यात येतो. जेणेकरून हवामान बदलाचे धोके ओळखून त्याच्या पूर्वसूचना अधिक अचूक मिळू शकतात..डीप ओशन अभियानासाठी आखडता हातसमुद्राच्या तळातील संशोधन आणि खनिज संसाधने यांचा अभ्यास करण्यासाठी डीप ओशन अभियान राबवले जाते. या अभियानातून प्रामुख्याने हिंदी महासागरात संशोधन केले जाते. यामध्ये भूगर्भशास्त्रीय, भौतिक आणि रासायनिक माहिती संकलित केली जाते..तसेच पर्यावरणीय अभ्यास केला जातो. या अभियानासाठी २०२५-२६ साठी सुधारित अंदाज ६६० कोटी रुपयांचा होता. मात्र २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात ६३५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामध्ये भांडवली खर्च १७५ कोटी असून ४५० कोटी महसुली खर्च आहे..Union Budget 2026: शेती बेदखलच!.दरम्यान, सप्टेंबर २०२५ मध्ये केंद्रीय मंत्रिमंडळाने या मौसम अभियानासाठी मंजुरी दिली. या मौसम अभियानासाठी २०२४ ते २०२६ दोन वर्षांच्या कालावधीसाठी २ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या मोहिमेचे उद्दिष्ट ५० डॉप्लर वेदर रडार, ६० रेडिओ सोंडे/रेडिओ विंड स्टेशन, १०० डिस्ड्रोमीटर, १० विंड प्रोफाइलर, २५ रेडिओमीटर, १ अर्बन टेस्टबेड, १ प्रोसेस टेस्टबेड, १ ओशन रिसर्च स्टेशन आणि १० मरीन ऑटोमॅटिक वेदर स्टेशन्स उभारण्याचे आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.