Minister Shivraj Singh Chouhan : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी घेतलं त्र्यंबकेश्वरचे दर्शन; 'शेतकऱ्यांना हे वर्ष समर्पीत'

Shivraj Singh Chouhan Trimbakeshwar visit : यंदाचे वर्ष मी शेतकऱ्यांना समर्पीत करत असल्याचे ते म्हणाले. तसेच आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.
Minister Shivraj Singh Chouhan
Minister Shivraj Singh Chouhanagrowon
Published on
Updated on

Agriculture Minister Shivraj Singh Chouhan : केंद्रीय कृषी, शेतकरी कल्याण व ग्रामीण विकासमंत्री शिवराजसिंह चौहान शुक्रवार (ता.०३) नाशिक दौऱ्यावर आले आहेत. नववर्षानिमीत्त केंद्रीय मंत्री चौहान यांच्यासह कुटूंबियांनी महाराष्ट्रातील त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिरात पूजा केली. यावेळा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यंदाचे वर्ष मी शेतकऱ्यांना समर्पीत करत असल्याचे ते म्हणाले. तसेच आगामी काळात शेतकरी हिताचे निर्णय घेणार असल्याची माहिती चौहान यांनी दिली.

शेतकऱ्यांसाठीच्या कल्याणकारी योजनांबाबत मंत्री चौहान म्हणाले की, "नवीन वर्षात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांसाठी ऐतिहासिक निर्णय घेण्यात आले आहेत. नवीन वर्ष शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी समर्पित असेल. वर्षाच्या १ तारखेला मी कुटूंबियांसोबत त्र्यंबकेश्वर मंदिराच्या दर्शनाला येत असतो. परंतु, केंद्राची मंत्रीमंडळ बैठक असल्याने आम्ही आज (ता.०३) आलो आहे. दरम्यान, मी दर्शनाला येत असताना पीक विमा योजनेतील पैशांची तरतूद ६९ हजार कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेऊन आलो आहे. यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे". असे प्रतिपादन केंद्रीय कृषी मंत्री चौहान यांनी केले.

Minister Shivraj Singh Chouhan
Solar Agriculture Scheme : सौर कृषी पंप योजनेपासून अल्पभुधारक शेतकरी वंचित; शेतजमीन अट ठरतेय जाचक

रासायनिक खतांना दिलेल्या सबसिडीबद्दल चौहान म्हणाले की, "रासायनिक खतांच्या कंपन्याकडून दरात वाढ करण्यात आली आहे. परंतु, शेतकऱ्यांना स्वस्त दर मिळावा यासाठी सरकारने अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांना स्वस्तात खते मिळावीत यासाठी शासनाने अनुदान दिले आहे. तसेच मागच्या ६ वर्षांपासून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात थेट किसान सन्मान निधी जमा करणारे मोदी सरकार आहे". असे चौहान म्हणाले.

पीक विमा योजनेबाबत शिवराज सिंह चौहान म्हणाले, "पीक विमा योजनेंतर्गत ८ कोटींहून अधिक शेतकऱ्यांनी विमा उतरवला यामध्ये ४ कोटी शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला आहे. पीक विमा योजनेंतर्गत नुकसान भरपाईबाबत शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून विमा उतरावा" असे चौहान यांनी सांगितले.

कांदा निर्यात बंदी उठवण्यासाठी शेतकरी करणार मागणी

नाशिकमधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी निर्यात शुल्क हटवण्याचा निर्णय तातडीने जाहीर करावा अशी मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी याबाबत आवाज उठवला आहे. राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकोटे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर कांदा प्रश्नावर केंद्र सरकारशी चर्चा करणार असल्याचे सांगितले होते.

तसेच कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क उठवण्याची मागणी केंद्र सरकारकडे करणार असल्याचा शब्द दिला होता. परंतु यावर अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. अशातच केंद्रीय कृषी मंत्री महाराष्ट्र दौऱ्यावर आल्याने कांद्यावरील निर्यात बंदी उठण्यावर चर्चा होऊन तोडगा निघणार का? याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com