Majhi Vasundhara Abhiyan Umri Nagar Parishad: उमरी : पर्यावरण संवर्धन, स्वच्छता आणि शाश्वत विकासाच्या दृष्टीने राबविलेल्या ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ स्पर्धेत उमरी नगर परिषदेने छत्रपती संभाजीनगर विभागातील १५ हजार लोकसंख्या गटात प्रथम क्रमांक मिळवत शहराच्या नावलौकिकात भर घातली. या यशाबद्दल नगर परिषदेला ७५ लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे..Majhi Vasundhara: ‘माझी वसुंधरा’मध्ये सांगली राज्यात प्रथम .या उल्लेखनीय कामगिरीच्या गौरवार्थ येत्या २१ फेब्रुवारीला मुंबई येथे नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार आहे. या यशाबद्दल आमदार राजेश पवार यांनी नगराध्यक्षा शकुंतला मुदिराज, उपनगराध्यक्ष कैलास देशमुख गोरठेकर, माजी नगराध्यक्ष प्रवीण सारडा, विष्णू पंडित आणि सर्व नगरसेवकांचे अभिनंदन केले. ही कामगिरी तत्कालीन मुख्याधिकारी नीलम कांबळे व गणेश चाटे यांच्या मार्गदर्शनात साकार झाली. स्वच्छता विभागाचे अभियंता विशाल बाराते, कार्यालयीन अधीक्षक कांचन पडलवार, नगर अभियंता कैलाश येमलवाड, लेखापाल बालाजी चवरे, संगणक अभियंता विनोद सावंत, रचना सहायक पूजा पावडे, वरिष्ठ लिपिक गणेश मदने, सचिन गंगासागरे यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या अभियानात मोलाचे योगदान दिले. .Majhi Vasundhara Campaign: ‘माझी वसुंधरा’ स्पर्धेमध्ये मान्याची वाडीची हॅटट्रिक.नगर परिषदेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे उमरी शहराने पर्यावरणपूरक विकासाचा आदर्श निर्माण केला असून, या यशामुळे शहराच्या प्रगतीला नवे बळ मिळाले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.