Solapur Water Crisis: उजनी धरणातून भीमा नदीपात्रात सोडलेले पाणी केवळ पिण्याच्या पाण्यासाठी वापरले जावे, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कडक पावले उचलली आहेत. त्यासाठी भीमा नदीकाठावरील शेतीपंपांचा वीजपुरवठा तातडीने खंडित करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी महावितरणला दिले आहेत. .उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या सोलापूरसह पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला या शहरांसह भीमा नदीकाठच्या अनेक ग्रामीण भागांत सध्या पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासत आहे, ही गरज ओळखून उजनीतून पाणी सोडण्यात आले आहे. मात्र हे पाणी वाटेतच शेतीसाठी उपसले गेल्यास पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ शकतो. .Water Management Awards: पाणी वापर संस्थांच्या कामगिरीत नाशिकचे वर्चस्व.त्यामुळे प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देत हा कठोर निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक सेवेसाठी केवळ तीन तास वीज सुरू करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना दिली आहे. .Water Management: आधुनिक तंत्रज्ञानाने जल व्यवस्थापनातील समस्येची उकल शक्य.या निर्णयानुसार भीमा नदीच्या दोन्ही काठांवरील शेतीपंपांचा वीजपुरवठा तत्काळ बंद करण्यात येईल. तसेच जलसंपदा विभाग आणि महावितरण यांच्या समन्वयाने या आदेशाची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत..उजनीतून पाणी सोडल्याने भीमाकाठच्या शेतीचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना देण्यात आले आहेत.- सुनील माने, अधीक्षक अभियंता, महावितरण, सोलापूर.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.