UIDAI Deactivates 2.5 Crore Aadhaar numbers: युनिक आयडेंटिफिकेशन ऑथोरिटी ऑफ इंडिया म्हणजेच ‘भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणा’ने (UIDAI) सुमारे २.५ कोटी मृत व्यक्तींचे आधार क्रमांक बंद केले आहेत. आधार ओळखपत्राचा गैरवापर रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती बुधवारी संसदेत देण्यात आली..इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री जितिन प्रसाद यांनी लोकसभेला दिलेल्या लेखी उत्तरात म्हटले आहे की, आधार ही जगातील सर्वात मोठी बायोमेट्रिक ओळख प्रणाली असून, त्यास सुमारे १३४ कोटी सक्रिय आधारधारक जोडलेले आहेत. आधार डेटाबेसची अचूकता आणि विश्वासार्हता कायम राखण्यासाठी देशभरात क्लीन-अप मोहीम राबवली जात आहे. याचाच एक भाग म्हणून, 'यूआयडीएआय'ने (UIDAI) आतापर्यंत मृत व्यक्तींचे २.५ कोटींहून अधिक आधार क्रमांक बंद केले आहेत..Aadhaar Style IDs Farmers : शेतकऱ्यांसाठी असणार वेगळं आधार कार्ड, केंद्र सरकारची नवी योजना आहे तरी काय?."एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर, संभाव्य फसवणूक टाळण्यासाठी अथवा त्या आधार क्रमांकाचा अनधिकृत वापर करून सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून रोखण्यासाठी संबंधित आधार क्रमांक निष्क्रिय करणे गरजेचे आहे,” असे प्रसाद यांनी यांनी नमूद केले आहे..PM Kisan 2026 Update: 'पीएम किसान'साठी फार्मर आयडी, ई-केवायसी बंधनकारक, जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया.त्यांनी पुढे म्हटले आहे की, देशात आयडेंटी फसवणुकीचा धोका कमी करण्यासाठी आणि विविध लाभांच्या वितरणात गैरवापर होऊ नये यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. ज्यात बायोमेट्रिक लॉक आणि अनलॉक फिचरचा समावेश आहे. यामुळे आधारधारकाला त्याचे बायोमेट्रिक्स 'लॉक' करता येते. परिणामी, कोणत्याही अनधिकृत प्रमाणीकरणाच्या प्रयत्नांना आळा बसेल..एखाद्या व्यवहारांदरम्यान लाभार्थी प्रत्यक्ष उपस्थित आहे का याची खात्री करण्यासाठी आणि बनावट (स्पूफिंग) ओळखीद्वारे फसवणूक करण्याच्या प्रयत्नांना आळा घालण्यासाठी ‘लाइव्हनेस डिटेक्शन फिचर’सोबतच ‘फेस ऑथेंटिकेशन’ प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. .आधारची सुरक्षितता वाढवण्यासाठी आधार सिक्युअर क्यूआर कोड, आधार पेपरलेस ऑफलाइन ई-केवायसी, ई-आधार तसेच आधार पडताळणीयोग्य क्रेडेन्शियल्सच्या माध्यमातून ऑफलाइन ओळख पडताळणीला प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.