Crop Insurance : पीक विम्यावरून ठाकरे गटाचा सरकारवर हल्लाबोल; पीक विमा कार्यालयातील खुर्च्याही तोडल्या

Uddhav Balasaheb Thackeray group : राज्यातील शेतकरी निसर्गाच्या लहरीपणामुळे चांगलाच अडचणीत सापडला आहे. मात्र यावर उपाययोजना न करता सरकार फक्त पीक विम्याचे कागदी घोडे नाचवत आहे. यावरून वाशिम आणि हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातला शेतकरी हा नुकसानीमुळे हतबल झाला आहे. यावर सरकारकडून फक्त पीक विम्याचे कागदी घोडे नाचवले जात आहेत. एक रुपयात पीक विमा या योजनेतून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली जात आहे. मात्र यातील नुकसान भरपाईची रक्कम ही १००० रूपयांच्याही खाली आहे. दरम्यान पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारीवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी वाशिम येथील पीक विमा कंपनीच्या कार्यलयात धुडगूस घातली. तसेच येथील खुर्च्यांची मोडतोड केली आहे. तर 'सामना'च्या अग्रलेखातून या मुद्द्यावरून शिंदे सरकारवर टीका करण्यात आली आहे.

यावेळी अग्रलेखातून, अन्नदात्या शेतकऱ्यावरच आज भटकंतीची वेळ आली आहे. पीक विम्याच्या नावाने ढोल पिटणाऱ्या सरकारच्या नावाने मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी मदतीसाठी टाहो फोडत आहेत. तो ‘आमचे रक्त घ्या आणि आम्हाला अन्न द्या,’ असे म्हणत आहे. शेतकऱ्याची आजही ही आवस्था सरकारी दावे किती पोकळ आहेत हेच दाखवून देत आहे, असं म्हटलं आहे.

Crop Insurance
Crop Insurance News : अग्रीम पीक विम्याचा मार्ग मोकळा, विम्या कंपन्यांना हप्त्यापोटी ६२८ कोटी रुपये मंजूर

तर वाशिममधील शेतकऱ्यांनी पीक विम्याची रक्कम मिळत नसल्याच्या तक्रारी केल्या आहेत. यावर सरकार किंवा प्रशासनाकडून कोणतेही पावले उचलली गेलेली नाहीत. यावरून ठाकरे गटाने राज्यात सत्तेत असलेल्या शिंदे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. यावेळी ठाकरे गटाने, पीक विम्याचा लाभच शेतकऱ्यांना मिळत नसेल तर या योजनेला काय अर्थ आहे अशी विचारणा केली आहे.

Crop Insurance
Crop Insurance: विम्या कंपन्याच्या गलथान कारभाराचा शेतकऱ्यांना फटका : राहुल गांधी

तसेच एकिकडे निसर्गाचा लहरीपणामुळे शेतकऱ्याला फटका बसत असताना सरकार मात्र फक्त चर्चा करत आहे. सरकारच्या अशी घोषणा म्हणजे घोषणांचे बुडबुडे असल्याची घणाघाती टीका ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे. यावेळी अवकाळीने खरीप आणि रब्बी हंगाम वाया गेला आहे. अशा वेळी सरकार फक्त गाजावाजा करत आहे. शेतकऱ्यांच्या पदरात पीक विम्याचा लाभच पडत नसल्याने हतबल शेतकऱ्याने करायचे काय? असे म्हटले आहे.

तसेच वाशिममध्ये पीक विम्यावरून आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांनी मालेगाव येथील पीक विमा कार्यालयातील खुर्च्या तोडल्या. तसेच कार्यकर्त्यांनी पीक विमा अधिकाऱ्याला धारेवर धरत कार्यालयातील बॅनरदेखील फाडले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com