Grape Pest Management: द्राक्ष बागेत फळछाटणीनंतर नवीन फुटवे येताच उडद्या भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव दिसू लागतो. ही कीड डोळे, कोवळी पाने व फुटवे खाते. अलीकडे घड व मण्यांवरही नुकसान आढळून आले आहे. या किडीमुळे ५५ टक्क्यांपर्यंत पिकाचे नुकसान होऊ शकते. आजच्या लेखात या किडीची छायाचित्रांसह ओळख करून घेऊ..सामान्य नाव : उडद्या भुंगा (Udadya beetle, Grape flea beetle)शास्त्रीय नाव : स्केलोडॉन्टा स्ट्रिजिकॉलिस (Scelodonta strigicollis)गण (Order) : कोलिओप्टेरा (Coleoptera)कुळ (Family) : क्रायसोमेलिडी (Chrysomelidae)नुकसानकारक अवस्था : प्रौढ..किडीची ओळखअंडी अवस्था : अंडी फिकट पांढऱ्या रंगाची, सिगारसारखी लांबट, गुळगुळीत व चमकदार पृष्ठभागाची असतात. सरासरी लांबी ०.९ मि.मी. व रुंदी ०.२५ मि.मी. असते. एक मादी आयुष्यात सुमारे २०० ते ६०० अंडी देऊ शकते.अळी अवस्था (Grub) : पहिल्या इंस्टारमधील अळ्या पांढऱ्या रंगाच्या, फिकट तपकिरी डोक्याच्या व अधिक चपळ असतात. शेवटच्या इंस्टारमध्ये अळीचा रंग पिवळसर व डोके गडद तपकिरी होते..Grape Disease Management: संभाव्य वातावरणात वाढू शकतो केवडा, करपा रोगाचा धोका.कोष अवस्था : कोष फिकट क्रीम रंगाचा असतो. कोषाची लांबी सरासरी ४.२ मि.मी., तर रुंदी २.२ मि.मी. असते.प्रौढ अवस्था : प्रौढ भुंगे लहान, चमकदार तपकिरी ( कांस्य धातूसारख्या छटेचे) व काहीसे चौकोनी आकाराचे असतात. प्रत्येक पंखावर (elytra) तीन ठळक काळे ठिपके असतात. नर भुंग्याची सरासरी लांबी ३.९ मि.मी., तर मादीची लांबी ४.१ मि.मी. असते. हे भुंगे निशाचर असल्याने त्यांचा प्रादुर्भाव सहज लक्षात येत नाही..जीवनक्रममादी द्राक्षवेलीच्या सालीखाली, तसेच सालीच्या भेगांमध्ये २० ते ४० अंड्यांच्या समूहात अंडी घालते. ही अंडी ४ ते ८ दिवसांत उबतात. अळी मातीत राहून मुळांवर उपजीविका करते आणि सहा इंस्टार अवस्था ३६ ते ३७ दिवसांत पूर्ण करते. त्यानंतर ती मातीत कोषकक्ष तयार करून कोषावस्थेत जाते. कोषावस्था ९ ते १० दिवसांची असते. प्रौढ अवस्थेचा नेमका कालावधी संशोधन साहित्यात नमूद केलेला नाही. संपूर्ण जीवनक्रम सुमारे ५२ दिवसांत पूर्ण होतो. वर्षभरात सुमारे ४ पिढ्या पूर्ण होऊ शकतात. प्रौढ भुंगे डिसेंबर ते मार्च या कालावधीत द्राक्षवेलीच्या सालीखाली तसेच खोडावरील भेगा व फटींमध्ये सुप्तावस्थेत राहतात..Grape Disease Management: द्राक्ष बागेच्या फळछाटणीनंतर रोगांचे नियंत्रण कसे करावे?.नुकसानीचा प्रकारछाटणीनंतर नवीन फुटवे येताना प्रौढ भुंगे फुटणारे डोळे खरवडतात किंवा पूर्णपणे खाऊन टाकतात. असे डोळे फुटत नाहीत आणि वाळून जातात. प्रादुर्भावग्रस्त डोळ्यांतून निघालेली पाने जाळीसारखी दिसतात. याशिवाय कोवळे फुटवे, तणाव (tendrils) व पाने खाल्ली जातात. पूर्ण वाढलेल्या पानांवर लांबट व आयताकृती छिद्रे दिसतात. अलीकडच्या काळात या किडीचा प्रादुर्भाव द्राक्ष घड व मण्यांवरही दिसून येत आहे. प्रौढ भुंगे मणी व देठ सरळ रेषेत खातात. त्याच्या खुणा पुढे तपकिरी होऊन द्राक्षांची प्रत खालावते. अळ्या जमिनीत मुळांवर उपजीविका करतात, परंतु त्यांचे नुकसान आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जात नाही..किडीचे व्यवस्थापनछाटणीनंतर खाली पडलेली पाने गोळा करून नष्ट करावीत. बाग स्वच्छ ठेवावी.जमिनीची कुळवणी/खुरपणी करून माती हलवावी, म्हणजे अळ्या व कोष उन्हाच्या संपर्कात येऊन नष्ट होतील.अॅग्रोवन विशेष टीपकिडीचे नियंत्रण- राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राच्या शिफारसीनुसार लेबल क्लेम असलेल्या कीटकनाशकांचा पीएचआय व एमआरएल पाहून वापर करावा.-रवींद्र पालकर ८८८८४०६५२२पीएच. डी. स्कॉलर, कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.