UAE Agriculture Market: महा-एफपीसीचा ऐतिहासिक निर्णय! शेतकरी कंपन्यांसाठी गल्फ बाजारपेठ खुली

Indian Agriculture Exports: महा-एफपीसीच्या पुढाकाराने शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट निर्यातीची संधी उपलब्ध होत आहे. ‘दुबई डिक्लरेशन २०२५’ अंतर्गत १०० कोटींच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधी निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
MAHA FPC
MAHA FPCAgrowon
Published on
Updated on

Pune News: शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून शेतीमाल निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी महाएफपीसीने पुढाकार घेतला आहे. या उद्देशाने महाएफपीसी संचालक मंडळाने संयुक्त अरब अमिराती (UAE) दौरा केला. डाळवर्गीय पिके आणि कांदा यांना केंद्रस्थानी ठेवून दुबई, अबुधाबी आणि शारजा येथील कृषी बाजारपेठा, सुपरमार्केट आणि हायपरमार्केट यांना भेटी देण्यात आल्या.

दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये आयोजित प्रतिष्ठित ‘गल्फ फूड २०२५’ प्रदर्शनात देखील प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला तसेच या निमित्ताने महाएफपीसी शिष्टमंडळाने निर्यात पायाभूत सुविधा, गुंतवणूकदार, आणि फूड हब प्रतिनिधींसोबत महत्त्वपूर्ण चर्चा केली.

MAHA FPC
Grape Export Issue: इस्राईल-हमासमधील युद्ध थांबल्यानंतरही वाहतूक बंदच; द्राक्ष निर्यातदारांची चिंता वाढली!

या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना थेट निर्यात करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महाएफपीसीकडून विशेष उद्देश वाहन (SPV) स्थापन करण्याची योजना असून यामुळे कंपन्यांना निर्यात झालेल्या शेतीमालाच्या साठवणुकीसाठी गोदाम व्यवस्था, होलसेल आणि रिटेल विक्रीसाठी आवश्यक सुविधा तसेच खरेदीदारांकडून पेमेंटची खात्री मिळण्यास सुविधा होणार आहे.

MAHA FPC
Grape Export: सांगली जिल्ह्यातून तीन हजार टन द्राक्ष निर्यात

प्रथम टप्प्यात महाएफपीसी संयुक्त अरब अमिरातीमध्ये लॉजिस्टिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नामांकित फूड हब, खरेदीदार यांच्यासोबत भागीदारी करण्यावर भर देणार असून त्यानंतर इतर गल्फ देशांमध्ये विस्तार करण्याचा मानस आहे. तसेच निर्यात मूल्य साखळी बळकट करण्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या स्तरावर गुंतवणुकदारांना निमंत्रित केले जाणार आहे.

शंभर कोटींच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधी निर्माण उद्देश

महाएफपीसीने ‘दुबई डिक्लरेशन २०२५’ उपक्रमांतर्गत १०० कोटींच्या आंतरराष्ट्रीय व्यवसाय संधी निर्माण करण्याचा महत्त्वाकांक्षी उद्देश ठेवला आहे. या उपक्रमात पाच प्रमुख दिशानिर्देशांचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांमध्ये प्रवेश वाढवणे, कृषी निर्यात लॉजिस्टिक्स मजबूत करणे, आंतरराष्ट्रीय वित्तीय स्रोत मिळवणे, निर्यात व्यवसायातील ज्ञान व्यवस्थापन सुधारणा, व्यवसाय विविधीकरणाला चालना देणे, या पुढाकारामुळे महाराष्ट्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना जागतिक बाजारपेठांमध्ये थेट सहभाग घेण्याची संधी मिळणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com