Ai in Agriculture: साताऱ्यातील दोन हजार शेतकरी होणार टेक्नोसॅव्ही
Smart Agriculture: बदलते हवामान, वाढता उत्पादन खर्च, मजुरांची टंचाई आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतीसमोर मोठी आव्हाने उभी आहेत. या पार्श्वभूमीवर पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने सातारा जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येणार आहे.