Animal Science : डॉ. विजयश्री हेमके यांना दोन पेटंट जाहीर

Patents For Research : चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागात कार्यरत प्रा. डॉ. विजयश्री हेमके यांना नुकतेच इंग्लंड व भारत सरकारचे राष्ट्रीय पेटंट जाहीर झाले आहे.
Dr. Vijayshree Hemke
Dr. Vijayshree Hemke Agrowon
Published on
Updated on

Pune News : चिखली येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागात कार्यरत प्रा. डॉ. विजयश्री हेमके यांना नुकतेच इंग्लंड व भारत सरकारचे राष्ट्रीय पेटंट जाहीर झाले आहे. संशोधनकार्यात पेटंट प्राप्त होणे ही मोठी गौरवाची बाब समजली जाते.

डॉ. हेमके या प्राणिशास्त्र विषयातील पीएचडी गाइड असून, हे पेटंट इंग्लंड सरकारद्वारे ‘इंटरॅक्टिव इंरिचमेंट फीडर’ या संशोधनासाठी पेटंट प्रदान करण्यात आले आहे. या संशोधनाचा प्राणी संरक्षणासाठी बनविलेले नॅशनल पार्क, प्राणी संग्रहालय, संशोधनासाठी असणारे ॲनिमल हाउस यासाठी उपयोग होणार आहे.

Dr. Vijayshree Hemke
Agriculture Research : कृषी संशोधनाची दशा अन् दिशा

भारत सरकारने दिलेले पेटंट हे ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स पॉवर प्रिसिजन विडर’ या विषयावर आहे. हे मशिन तण आणि पिकातील फरक ओळखून केवळ तणावर तणनाशकाची फवारणी करेल, असे भारतीय शेतीस उपयुक्त अशा मशिनचे हे डिझाइन आहे.

Dr. Vijayshree Hemke
Agricultural Research: नव्या कृषी मंत्र्यासमोर कृषी संशोधनाला गती देण्याची जबाबदारी

या संशोधन कार्यात डॉ. हेमके यांच्यासह डॉ. सविता नलावडे सहयोगी प्राध्यापक-प्राणिशास्त्र, सातारा या देखील सहभागी होत्या. या पेटंटमुळे श्री शिवाजी महाविद्यालयाच्या लौकिकात भर पडली आहे.

श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम वायाळ, प्रभारी प्राचार्या डॉ. मीना निकम आदींनी डॉ. हेमके यांचे अभिनंदन केले असून त्यांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे.त्याबद्दल डॉ. हेमके यांनी आभार व्यक्त केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com