Chhatrapati Sambhajinagar News : सकाळ-अॅग्रोवनने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. चार दिवस चाललेल्या या प्रदर्शनात शेतकरी, उत्पादक आणि कृषी तज्ज्ञ यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. या वेळी विविध प्रकारची कृषी यंत्रसामग्री, अवजारे आणि तंत्रज्ञान प्रदर्शित करण्यात आले होते. विशेष म्हणजे प्रदर्शन काळात लाखोंची उलाढाल नोंदवली गेली..प्रदर्शनाच्या चार दिवसांच्या काळात हजारो शेतकऱ्यांनी विविध दालनांना भेटी देत आपल्याला आवश्यक असलेली यंत्रसामग्री, उपकरणे आणि साधने थेट खरेदी केली. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानाची पाहणी करण्यास मोठा उत्साह दाखवला. ड्रोन तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन उपकरणे, ऑटोमेटेड खत वितरण यंत्रणा, तसेच हलक्या वजनाचे ट्रॅक्टर, मळणी यंत्र, सौर उपकरणे आणि पीक संवर्धनासाठी वापरली जाणारी उपकरणे येथे प्रात्यक्षिक स्वरूपात सादर केली गेली होती..Agrowon Exhibition 2026: शेतकऱ्यांची मांदियाळी एकवटली!.यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा कसा मिळवता येईल हे प्रत्यक्षात अनुभवता आले. फक्त उपकरणांची विक्रीच नव्हे, तर अनेकांनी नोंदणी प्रक्रियाही या ठिकाणी पूर्ण केली. यामुळे कृषी उपक्रमात शेतकऱ्यांचा सहभाग वाढेल, तसेच शासनाच्या विविध योजनेचा लाभ थेट पोहोचेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे..प्रदर्शनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी या ठिकाणी आपल्याला, शेतीला हवी असलेली साधने मिळाल्याचे, बघता आल्याचे समाधान व्यक्त केले. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडणे आणि त्यांच्या उत्पादनक्षमतेत वाढ करण्याच्या उद्देशाने दालनांची रचना केलेली होती. स्थानिक उत्पादकांनाही आपली उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते..Agriculture Exhibition 2026: यांत्रिकीकरणासह नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाने वेधले लक्ष.चार दिवसांत हजारो शेतकऱ्यांनी प्रदर्शनास भेट दिली. यामुळे शेतकऱ्यांमध्ये कृषी क्षेत्रातील नवकल्पना, आधुनिक उपकरणे आणि तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता निर्माण झाली. एकूणच छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनाने शेती क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यास मोलाचा वाटा उचलला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही..या यंत्रांची झाली मोठी विक्रीसोलर ड्रायर, दालमिल, पशुखाद्य तयार करणारे यंत्र, नांगर, रोटाव्हेटर, पेरणीयंत्र, मळणीयंत्र, टोकणयंत्र, भर लावणी यंत्र, बेड यंत्र, बहुपयोगी सेट, मल्चिंग यंत्र, दुग्धजन्य पदार्थ, मिल्किंग मशीन, सायलेज बॅग,डबल बकेट मिल्किंग मशिन, सिंगल बकेट मिलकींग मशिन, चॉप कटर, बाहुबली स्प्रेअर पंप, कडबा कुट्टी मशिन, ट्रॉली, पॉवर विडर १२ एचपी, पेट्रोल पॉवर विडर, ब्रश कटर, ब्लोअर, ट्रेलर, ७ एचपी पॉवर विडर, कम्बाईन हार्वेस्टर, कुट्टी ट्रॅक्टर मशिन ज्यामध्ये मका सोंगून मुरघास स्टोअर करण्याची सुविधा आहे अशा विविध यंत्रांची सुमारे १० कोटींपर्यंत विक्री झाल्याचा अंदाज आहे..ॲग्रोवनचे हे कृषी प्रदर्शन म्हणजे आमच्यासाठी पर्वणीच ठरले. या प्रदर्शन काळात आम्हाला आमच्या व्यवसायासाठी वर्षभराची शिदोरी मिळते. थेट ग्राहक आमच्याशी जोडले जातात. शेतकरी उत्पादित शेतीमालासोबतच प्रक्रिया केलेल्या उत्पादनांना ग्राहक मिळतो.लक्ष्मीबाई खंडागळे , देवगिरी तेलघाणा, अब्दी मंडी, छत्रपती संभाजीनगर..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.