Nagpur News: संततधार पावसामुळे यंदा हळदीची उत्पादकता व त्यातून बाजार आवकेवर परिणाम होऊन दर तेजीत राहतील असे सांगितले जात होते. मात्र लागवड क्षेत्रातील वाढीमुळे आवकेवर कोणताच परिणाम होणार नाही, असा दावा व्यापाऱ्यांकडून केला जात आहे. सध्या विदर्भ, मराठवाड्यातील बाजारात रोज सरासरी १००० क्विंटल इतकी हळदीची आवक होत असून १३ ते १३,५०० रुपये क्विंटल दराने हळदीचे व्यवहार होत आहेत, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. .व्यापारी अशोक बाहेती यांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सांगली जिल्हा हळद उत्पादनासाठी सर्वदूर ओळखला जातो. राजापुरी जातीच्या हळद वाणाची लागवड या भागात होते. या हळदीमध्ये कुरकुमीनचे प्रमाण अधिक असल्याने त्याला दरही चांगला मिळतो. त्यासोबतच विदर्भ, मराठवाड्यात सेलम जातीचे हळद वाण लावले जाते. नजीकच्या काळात वाशीम जिल्ह्यातील रिसोड, शिरपूर जैन, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील विडूळ (ता. उमरखेड) या भागांत हळदीखालील लागवड क्षेत्रात वाढ नोंदविण्यात आली आहे. .Turmeric Price: हळदीचा भाव टिकून; तसेच काय आहेत सोयाबीन, कापूस, टोमॅटो आणि कारलीचे आजचे बाजारभाव .सुरुवातीच्या काळात मराठवाड्यातील हिंगोली परिसरात हळद लागवड क्षेत्र मोठे होते. त्याऐवजी आता विदर्भ मराठवाड्याने लागवड आणि उत्पादनात आघाडी घेतली आहे. या हळद उत्पादकांना वाशीम, रिसोड, हिंगोली येथील बाजारपेठांचा विक्रीसाठी पर्याय उपलब्ध आहे, असेही त्यांनी सांगितले. सध्या हिंगोली बाजारात कांडी हळदीला १४ ते १५ हजार रुपये क्विंटल आणि बंडाला १३ ते १३५०० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. .Turmeric Price Trend: जोखीम व्यवस्थापनासाठी वायदे बाजार आवश्यक.नव्या हंगामातील हळदीची आवक होताच दर काहीसे दबावात येतील अशी शक्यता आहे. साधारणतः फेब्रुवारीच्या अखेरीस नव्या हळदीचा हंगाम सुरू होतो. त्यानंतर एप्रिलपर्यंत या हळदीची बाजारातील आवक वाढती राहते. शिरपूर जैन (वाशिम) येथील हळद उत्पादक डॉ. गजानन ढवळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाचा फटका बसल्याने यंदा सरासरी २५ टक्के उत्पादकता प्रभावित होईल, असा अंदाज होता. मात्र लागवड क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे ही तूट भरून निघेल अशी सध्याची परिस्थिती आहे. त्यामुळे बाजारातील आवकेचा फारसा परिणाम होणार नाही. दर देखील ११,५०० रुपये क्विंटलच्या पुढे राहतील..सध्या हळद कांडीला १४ ते १५ हजार रुपये क्विंटल, तर बंडा हळदीला १३ ते १३,५०० रुपये क्विंटल असा दर मिळत आहे. यंदा पावसामुळे उत्पादकतेवर परिणाम झाला असली तरी लागवड क्षेत्रात झालेल्या वाढीमुळे बाजारातील आवकेवर विशेष परिणाम होणार नाही. त्यासोबतच दरही स्थिर राहतील असा अंदाज आहे.- अशोक बाहेती, हळद व्यापारी.२०२३-२४ मध्ये हळदीचे दर सहा हजार ते साडेसात हजार रुपयांवर आले होते. त्यामुळे लागवड क्षेत्रात घट नोंदवली गेली. त्यानंतरच्या काळात मात्र हळदीचे दर सातत्याने वाढत होते. साधारण दहा हजार रुपये क्विंटलच्या पुढे हळदीचे दर असल्याने लागवड क्षेत्रात वाढ झाली.संतोष मोरे, हळद उत्पादक, विडूळ, जि. यवतमाळ.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.