
Washim News : जिल्ह्यातील रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीने गेल्या काही वर्षांत हळद खरेदी आणि विक्रीच्या बाबतीत सातत्य राखले आहे. हळद उत्पादक शेतकऱ्यांना या पिकाबाबत मार्गदर्शन तथा नवनवीन तंत्रज्ञान उपलब्ध करून देण्यासाठी बाजार समितीकडून हळद परिषदेचे आयोजन केले जाते.
याही वर्षी रविवारी (ता. २३) हळद परिषद होत असून, याच वेळी चिया खरेदीचा प्रारंभही केला जाणार आहे, अशी माहिती बाजार समितीचे सभापती विष्णुपंत भुतेकर यांनी दिली. जिल्ह्यातील चिया उत्पादकांनी रविवारी आपला माल विक्रीसाठी रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीत घेऊन येण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
हळद परिषदेचे उद्घाटन जिल्हा उपनिबंधक ओमप्रकाश साळुंखे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाजार समितीचे माजी सभापती तथा विद्यमान ज्येष्ठ संचालक शामराव पाटील उगले राहतील.
या वेळी बाजार समिती उपसभापती इंदूताई तेजराव वानखेडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शाह यांची प्रमुख उपस्थिती राहील. या वेळी कसबे दिग्रस येथील हळद संशोधन केंद्राचे माजी प्रभारी अधिकारी दिलीप काटमले हे हळदीविषयी मार्गदर्शक असतील.
कार्यक्रमासाठी व चियापीक व्यवस्थापनाबाबत आत्मा प्रकल्प संचालक अनिसा महाबळे मार्गदर्शन करतील. या वेळी सुरेश मनचंदा (दिल्ली) हे त्यांच्या चमूसह उपस्थित राहतील.
आत्मा उपसंचालक किशोर मोरे, रिसोडच्या तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर, केव्हीकेच उद्यानविद्या विषयतज्ज्ञ निवृत्ती पाटील, सहायक निबंधक भास्करराव मोरे, महेश गाडवे यांचीही उपस्थिती राहील.
रविवारी सकाळी ११ वाजता हळद परिषदेचा प्रारंभ होणार असून, हळद परिषदेमध्ये रिसोड तालुक्यातील विक्रमी हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्नीक साडीचोळी देऊन सत्कार करण्यात येणार आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.