Crop Variety : तुरीच्या फुले पल्लवी, वालाच्या फुले श्रावणी वाणांचे लोकार्पण

MPKV Rahuri : चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यू.बी. १७-१८) हा वाण बागायती उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रासाठी विकसित केलेला आहे.
Crop Variety
Crop VarietyAgrowon
Published on
Updated on

Nagar News : राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठांतर्गत कार्यरत असलेल्या कडधान्य सुधार प्रकल्पाने विकसित केलेला तुरीचा वाण फुले पल्लवी (फुले तूर १२-१९-२) आणि क्षमता असणाऱ्या पिकावरील संशोधन प्रकल्पाने विकसित केलेला चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यू.बी. १७-१८) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नुकतेच लोकार्पण करण्यात आले. नवी दिल्ली येथील भारतीय कृषी संशोधन संस्थेच्या (पुसा) प्रक्षेत्रावर हा कार्यक्रम झाला.

कार्यक्रमात या वेळी देशभरातील ६१ पिकांच्या १०९ वाणांचे लोकार्पण करण्यात आले. यामध्ये ३४ शेतपिकांचा आणि ७२ बागायती उद्यानविद्या पिकांचा सामावेश आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माजी संशोधन संचालक डॉ. सुनील गोरंटीवार, विद्यमान संशोधन संचालक डॉ. विठ्ठल शिर्के यांचे मार्गदर्शनाखाली राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्प येथून विकसित झालेल्या दोन वाणांचा सामावेश आहे.

Crop Variety
Crop Varieties Conservation : स्थानिक जातींच्या संवर्धनासाठी आधुनिक बियाणे बॅंक

तूर वाण विकसित करण्यामध्ये कडधान्य प्रकल्पाकडील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एन. एस. कुटे, वरिष्ठ संशोधन सहायक डॉ. व्ही.एम. कुलकर्णी, वरिष्ठ संशोधन सहायक वाय. आर. पवार, तूर रोगशास्त्रज्ञ डॉ. व्ही. ए. चव्हाण, तूर कीटकशास्त्रज्ञ डॉ. सी. बी. वायळ आणि कृषी सहायक वसंत भोजने यांचे योगदान आहे.

वालाचा वाण विकसित करण्यामध्ये क्षमता असणाऱ्या पिकावरील संशोधन प्रकल्पाकडील पीक पैदासकार डॉ. एम. टी. भिंगारदे, प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सुरेश दोडके, सहायक प्राध्यापक डॉ. वाय. जी. बन, कृषी सहायक बी. आर. अडसुरे, एस. एस. वेताळ यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.

Crop Variety
Crop Variety : जैवसंवर्धनयुक्त पिकांच्या १०९ वाणांचे लोकार्पण

तुरीच्या वाणाची वैशिष्ट्ये

- तुरीचा फुले पल्लवी (फुले तूर १२-१९-२) हा वाण मध्यम पक्वता कालावधी (१५७ ते १५९ दिवस) असून देशाच्या मध्य भारतातील महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि गुजरात या राज्यांत बागायत आणि जिरायती क्षेत्रासाठी लागवडीकरिता शिफारस करण्यात आली आहे. प्रति हेक्टरी २१.४५ क्विंटल सरासरी उत्पादन मिळते.

- दाणे टपोरे फिकट तपकिरी रंगाचे आहेत. मर व वांझ या तूर पिकातील प्रमुख रोगांना हा वाण मध्यम प्रतिकारक्षम असून, शेंगा पोखरणारी अळी आणि शेंगमाशी या किडींना कमी बळी पडतो.

वालाच्या वाणाची वैशिष्ट्ये

- चारधारी वालाचा वाण फुले श्रावणी (पी.डब्ल्यू.बी. १७-१८) हा वाण बागायती उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या क्षेत्रासाठी विकसित केलेला आहे. हा वाण अधिक उत्पादनक्षम असून हिरव्या शेंगाचे प्रति हेक्टरी १४२.९६ क्विंटल उत्पादन मिळते.

- वाळलेल्या दाण्यांचे प्रति हेक्टरी १३.८१ क्विंटल उत्पादन मिळते. या वाणामध्ये प्रथिनांचे प्रमाण २४.९५ टक्के आहे. या वाणावर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव आढळून आला नाही.

तुरीचा फुले पल्लवी आणि चारधारी वालाचा फुले श्रावणी या दोन्ही वाणांचे पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण होणे हे महात्मा फुले कृषी विद्यापीठासाठी अभिमानास्पद बाब आहे. यामुळे विद्यापीठाचे संशोधन अधिक लोकाभिमुख होण्यासाठी आणि वाण प्रसारास चालना मिळणार आहे.
- डॉ. पी. जी. पाटील, कुलगुरू महात्मा फुले कृषी विद्यापीठ

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com