Tur Sowing : सांगली जिल्ह्यात तुरीचे क्षेत्र वाढले

Tur Production : यंदाच्या खरीप हंगामात जत तालुक्यात १० हजार ३९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात ४ हजार ३२८ हेक्टरने वाढ झाली आहे.
Tur Farming
Tur FarmingAgrowon
Published on
Updated on

Sangli News : जिल्ह्यात यंदा वेळेत पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी तूर पिकाची पेरणी वेळेत केली आहे. जिल्ह्यात यावर्षीच्या खरीप हंगामात १० हजार ९७६ हेक्टरवर पेरा झाला आहे. जत तालुक्यात तुरीचा सर्वाधिक पेरा होतो. यंदाच्या खरीप हंगामात जत तालुक्यात १० हजार ३९७ हेक्टरवर पेरणी झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तुरीच्या क्षेत्रात ४ हजार ३२८ हेक्टरने वाढ झाली आहे. तूर पिकाला पोषक वातावरण असल्याने पिकाची चांगली वाढ झाली आहे.

जिल्ह्याचे तुरीचे सरासरी क्षेत्र ११ हजार १८४ हेक्टर आहे. जत तालुक्यात प्रामुख्याने खरीप हंगामातील तूर पीक घेतले जाते. त्याचबरोबर खानापूर, आटपाडी, तासगाव, कवठेमहांकाळ या तालुक्यात कमी अधिक क्षेत्रावर तुरीची पेरणी केली जाते. तसेच कडेगाव तालुक्यातही काही भागात शेतकरी तुरीचे उत्पादन घेतात.

Tur Farming
Kharif Sowing : नगरला खरीप पेरा सरासरीच्या सव्वाशे टक्के

गतवर्षी उन्हाळी आणि मॉन्सूनपूर्व पावसाने दडी मारली होती. यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी तूर पिकाची पेरणी केली नाही. त्यामुळे जिल्ह्यात गतवर्षीच्या खरीप हंगामात ६ हजार ६४८ हेक्टर म्हणजे ५९ टक्के पेरा झाला होता. २०२२-२३ मध्ये ९९०० हेक्टर पेरा झाला होता. २०२२-२३ च्या तुलनेत परिणामी तुरीच्या क्षेत्रात ३२५२ हेक्टरने घट झाली होती.

यंदा जिल्ह्यातील तूर उत्पादन घेणाऱ्या भागात उन्हाळी आणि पूर्वमोसमी पाऊस वेळेत सुरू झाला. त्यामुळे जत तालुक्यासह अन्य तालुक्यांतील शेतकऱ्यांनी तूर पिकाची वेळेत पेरणी सुरू केली. त्यामुळे यंदाच्या खरीप हंगामात तुरीची १० हजार ९७६ हेक्टरवर पेरणी झाली.

Tur Farming
Tur Sowing : नगर जिल्ह्यात यंदा तुरीची सरासरीच्या दुप्पट पेरणी

पेरणीनंतरही जिल्ह्यात सर्वदूर चांगला पाऊस झाला. त्यामुळे पिकाची वाढ होण्यास मदत झाली. तुरीला पोषक वातावरण असल्याने पिकाची वाढ चांगली झाली आहे. जत तालुक्यात सर्वाधिक तुरीचा पेरा झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप हंगामात ४ हजार ३२८ हेक्टरने तुरीचे क्षेत्र वाढले आहे.

जिल्ह्यातील तालुकानिहाय तूर क्षेत्र दृष्टिक्षेप (हेक्टरमध्ये)

तालुका २०२३-२४ २०२४-२५

मिरज ०.९० ००

जत ६३०६.९० १०३९७

खानापूर १०४ ८१

तासगाव २३५ ३३३

आटपाडी ०० ११३

कवठेमहांकाळ १ ३२

कडेगाव १ २०

एकूण ६६४८ १०९७६

यंदा तालुक्यात तुरीचे क्षेत्र वाढले आहे. सध्या पोषक वातावरणामुळे पीक चांगले असून रोगाचा प्रादुर्भाव दिसत नाही. पण रोगाचा प्रादुर्भाव आढळून आल्यास शेतकऱ्यांनी कृषी विभागाशी संपर्क साधावा.
- प्रदीप कदम, तालुका कृषी अधिकारी, जत

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com