Buldana News : सोयाबीन-कापसाला दरवाढ, पीकविमा मदत आदी प्रश्नी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी शुक्रवारी (ता.१९) पुकारलेले ‘रेल रोको’चे आंदोलन पोलिसांनी त्यांना एकदिवस आधीच अटक करून आंदोलन दडपले. तुपकर यांच्या अटकेच्या निषेधात कार्यकर्त्यांनी जिल्हाभर ठिकठिकाणी टायर जाळून शासनाच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला.
दरम्यान, तुपकरांशिवाय मलकापूर येथे आंदोलन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शंभरपेक्षा अधिक जणांना पोलिसांनी स्थानबद्ध केले. सोयाबीन-कापसाला दरवाढ, येलो मोझॅक, बोंडअळीची, दुष्काळाची नुकसान भरपाईसह शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकर यांनी ‘रेल रोको’ आंदोलन घोषित केले होते. त्यानंतर शेगाव लोहमार्ग पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली.
त्यांच्या घराभोवती तगडा बंदोबस्त लावला. पोलिसांना गुंगारा देत गुरुवारी (ता.१८) रात्री मलकापूरकडे जात असताना पोलिसांनी तुपकर यांना राजूर घाटात ताब्यात घेतले. ही बातमी जिल्हाभर पसरताच कार्यकर्ते ठिकठिकाणी रस्त्यावर आले. टायर जाळून शासनाविरुद्ध घोषणा दिल्या. आंदोलन दडपण्याचा हा सरकारचा डाव असून पोलिसांच्या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबत आहे, असा आरोप या वेळी तुपकर यांनी केला.
ठरल्यानुसार काही शेतकरी व तुपकरांचे समर्थक अॅड. शर्वरी तुपकर यांच्या नेतृत्वात मलकापूर येथे रेल रोको करण्यासाठी जात असताना स्टेशन बाहेरच त्यांना पोलिसांनी रोखले. नंतर पोलिसांनी या आंदोलकांना स्थानबद्ध केले. त्यांना नंतर सोडून देण्यात आले.
जामिनावर सुटका
रविकांत तुपकर यांना शुक्रवारी जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर तुपकर यांना जामिन दिला. त्यानंतर ते तत्काळ बाहेर आले आणि ‘शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दर मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहील,’’ असा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.