Tukaram Beej : तुकाराम बीजनिमित्त वारकऱ्यांची देहूत गर्दी; नामघोषाने दुमदुमला मंदिर परिसर

तुकाराम बीजनिमित्त वारकरी मोठ्या संख्येने देहूला पोहचले आहेत.
Tukaram Beej
Tukaram BeejAgrowon

Dehu News : जगदगुरु संत तुकाराम महाराजांच्या पादुकांच्या दर्शनासाठी वारकरी देहूमध्ये (Dehu) प्रचंड गर्दी करत आहेत. 'तुकाराम महाराज की जय' या नामघोषाने मंदिर परिसर दुमदुमला आहे.

तुकाराम बीजनिमित्त वारकरी (Warkari) मोठ्या संख्येने देहूला पोहचले आहेत. यंदा ३७५ वी तुकाराम बीज आज (ता.९) पार पडत आहे. आजच्याच दिवशी संत तुकारामांचे वैकुंठगमन झाले होते. यानिमित्ताने देहूत मंदिर परिसरात मोठा सोहळा आयोजित करण्यात येतो.

सकाळी ११ वाजता संत तुकारामांच्या पालखीची मिरवणूक सुरू झाली होती. मंदिर प्रदिक्षणा पूर्ण करून पालखी वैकुंठगमन मंदिरात पोहचेल.

त्यानंतर दुपारी १२ वाजता मंदिरात कीर्तन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पालखीमधील तुकारामांच्या पादुकाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी गर्दी करत आहेत.

Tukaram Beej
Grape Management : अवकाळी पावसाचे बागेवरील परिणाम

मंदिर परिसरात मोठ्या संख्येने सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. राज्यातील शेतकरी कष्टकरी वारकरी मंडळी तुकारामांच्या दर्शनासाठी देहूत पोहचले आहेत.

राज्यात मागील तीन दिवस पावसाने शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले. नुकसानतून सावरण्याचे बळ मिळावे, यासाठी शेतकरी वारकरी तुकारामांकडे धाव घेत आहेत.

पावसाने झालेल्या नुकसानीमुळे शेतकरी हैराण आहेत. आज (ता.९) राज्याचा अर्थसंकल्प विधानभवनात सादर करण्यात येईल. शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून आशा आहेत. शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या तरतुदी करण्यात येतील, अशीही अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

दरम्यान, सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पोलिस आणि शेतकऱ्यांमध्ये वाद झाल्याची माहिती समोर येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com