Pune News: शेतीमधील तणनियंत्रण पद्धतीत आमूलाग्र बदल घडवून आणण्याची क्षमता असलेले ‘तृण’ नावाचे स्वयंचलित यंत्र राहुल रावेरकर व चेतन शिंदे या दोघा उद्योजकांनी तयार केले आहे. केवळ सव्वा दोन तासांत एक एकरमधील तण लेसर किरणांद्वारे नष्ट करण्याची क्षमता या यंत्रात आहे..जळगावच्या रावेरमधील शेतकरी कुटुंबातील श्री. रावेरकर हे ‘इलेक्ट्रिकल’ इंजिनिअर आहेत; तर साताऱ्याच्या फलटण भागात शेती असलेल्या श्री. शिंदे यांनी ‘इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन’मध्ये पदवी संपादन केली आहे. या दोघांनी कृषी उद्योजक होण्याचे स्वप्न पाहिले. त्यासाठी श्री. शिंदे यांनी अॅमेझॉन कंपनीची चांगल्या पगाराची नोकरी सोडली. दोघांनी स्वभांडवलातून ‘आशमन टेक्निकल्स प्रायव्हेट लिमिटेड’ ही कंपनी २०१८ मध्ये स्थापन केली. पुण्याच्या शिवणे येथील दांगट इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये कंपनीचा प्लांट आहे..Wheat Weed Control: गहू पिकातील एकात्मिक पद्धतीने तण नियंत्रण.येथेच त्यांनी ‘तृण’ नावाचे स्वयंचलित तणनिर्मूलन यंत्र विकसित केले. यंत्राचा आकार १८३० मिमी लांबी, १५०० मिमी रुंदी व १३४० मिमी रुंदी असा आहे. यामध्ये तण नियंत्रणासाठी लेसर किरणांचा वापर केला जात असून, केवळ दोन युनिट वीज वापरामध्येच एक एकरमधील १६ प्रकारची तणे अवघ्या अडीच तासांच्या आत नष्ट करणे शक्य आहे.दूरनियंत्रकाद्वारे (रिमोट) चालणाऱ्या या यंत्राला चार चाके आहेत. शेतामधील सर्व पिकांच्या रचनेनुसार या चाकांमधील अंतर कमी-जास्त करता येते. स्वयंचलन (अॅटोमॅटिक) प्रणालीमुळे हे यंत्र खडबडीत किंवा असमतल जागेतून व्यवस्थित मागे-पुढे चालू शकते. शेतकऱ्यांना भासणारी मजूर उपलब्धता आणि शेतीमालातील रासायनिक अंशाच्या समस्येपासून मुक्ती देणारे हे यंत्र बॅटरीवर चालते. एकदा चार्ज केल्यानंतर सहा तास चालणारी बॅटरी अन्य इंधनाप्रमाणे प्रदूषण करत नाही..या यंत्रात बसवलेला एक कॅमेरा जमिनीवरील पीक व तणांच्या प्रतिमा घेत जातो. त्या प्रतिमांमधून नेमक्या तणांची ओळख करण्याचे काम ‘मशीन लर्निंग’ प्रणाली करते. तेवढ्याच तणांवर लेसर किरणाचा मारा करण्याचा आदेश ते लेसर प्रणालीस देते. प्राथमिक पातळीवर ‘तृण’ हे यंत्र यशस्वी असले तरी त्यात बाजारात आणतेवेळी आणखी काही सुधारणा करण्यात येणार आहेत. या यंत्राची बाजारातील किंमत ८ ते ९ लाख रुपयांच्या आसपास राहण्याची शक्यता आहे..Weed Control: लव्हाळा तण नियंत्रणाचे कमी खर्चात ४ प्रभावी उपाय.‘तृण’चे निर्माते श्री. रावेरकर म्हणाले, “आमची कंपनी औद्योगिक वापराचे यंत्रमानव व स्वयंचलित उत्पादने बनवते आहे. तथापि, मी आणि चेतन शिंदे दोघेही शेतकरीपुत्र असल्यामुळे शेतकऱ्यांना उपयुक्त अशा अभिनव उत्पादनाच्या निर्मितीचा संकल्प सोडला. त्यासाठी मीही नोकरी सोडली. पुढे आम्ही ‘तृण’च्या संकल्पचित्रावर अनेक महिने काम केले. सहा महिने जुळणी करीत अखेर यंत्र तयार केले..बारामती येतील कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञ संतोष करंजे यांनी आम्हाला तणाच्या जैविक रचना समजावण्यासाठी मदत केली. या यंत्रातील लेसर किरणे मूळ पीक सुरक्षित ठेवतानाच फक्त तण नष्ट करतात. यात आम्ही वापरलेला ‘ब्ल्यू फायबर लेसर’ तण जाळत नाही, तर भाजून काढतो. संपूर्ण भारतीय बनावटीच्या सामग्रीपासून तयार केलेल्या ‘तृण’ यंत्राच्या प्रक्षेत्र चाचण्या यशस्वी झाल्या आहेत. या वर्षीच्या बारामती येथील कृषिक प्रदर्शनात प्रथमच ते शेतकऱ्यांसमोर आणले आहे.” तृणची व्यावसायिक पातळीवरील निर्मिती लवकरच सुरू होईल..Lavhala Weed Control: कमी खर्चातही लव्हाळा तणाचे नियंत्रण शक्य....अशी आहेत ‘तृण’ची वैशिष्ट्येलेसर क्षमता : ८० वॉटभारवहन क्षमता : १५० किलोबॅटरी क्षमता : ३०० ॲम्पिअर तासचार्जिंग : एसी वीजपुरवठा, ६ ते ८ तासड्राईव्ह यंत्रणा : फोर व्हील ड्राइव्ह, इलेक्ट्रिक मोटार २४ वॉटशेतीकाम : एकदा चार्ज केल्यावर ६ तास चालतोवेग : ३ ते १५ किलोमीटर प्रति तास.लेसरद्वारे तण नियंत्रणाची भारतीय संदर्भात व्यवहार्यताआर्थिक बाजू ः सध्या हे तंत्रज्ञान खूप महाग असून, भारतातील अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी वैयक्तिक खरेदी करणे कठीण वाटते.तांत्रिक बाजू ः भारतीय शेतीमध्ये एकाच वेळी अनेक पिके घेतली जातात. अशा परिस्थितीत तण आणि पीक यातील फरक ओळखण्यासाठी या मशीनचे एआय मॉडेल अत्यंत प्रगत असले पाहिजे.पर्यावरणीय फायदे ः वाढत्या मजुरी खर्चामुळे भारतात रासायनिक तणनाशकांचा वापर वाढत असून, जमिनीचा पोत बिघडत आहे. लेझर तंत्रज्ञानामुळे विषमुक्त शेती करणे शक्य होईल. नांगरणी किंवा खुरपणीप्रमाणे जमिनीचा वरील सुपीक थर विस्कळीत होण्याचा धोका लेसरमुळे टाळला जातो..सध्याच्या स्थितीत लेसर वीडिंग तंत्रज्ञान वैयक्तिकरीत्या वापरणे आर्थिकदृष्ट्या परवडणारे नसले तरी सहकारी किंवा भाडेतत्त्वावर त्याचा वापर फायदेशीर ठरू शकतो. विशेषतः सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी हे यंत्र फायदेशीर ठरेल, असे वाटते.- डॉ. सचिन नलावडे, सहयोगी अधिष्ठाता, डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान महाविद्यालय, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.