Sugar Transportation : साखर वाहतुकीच्या मुद्दावरून साखर कारखानदारांविरोधात ट्रक असोशिएशन आक्रमक

Sugar Transportation Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार ट्रकधारक असून, पैकी सुमारे सात हजार ट्रकधारक ऊस वाहतूक करतात.
Sugar Transportation
Sugar Transportationagrowon

Kolhapur District Lorry Operators Association : कोल्हापूर डिस्ट्रिक्ट लॉरी ऑपरेटर्स असोसिएशनतर्फे कांदा, बटाटा, लसूण व गुळाची वाहतूक साफी भाडे तत्त्वावर सुरू करण्यात आली आहे. तर साखरेच्या वाहतुकीबाबत पश्चिम महाराष्ट्रातील ट्रकधारकांची बैठक घेऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

जिल्ह्यात सुमारे पंधरा हजार ट्रकधारक असून, पैकी सुमारे सात हजार ट्रकधारक ऊस वाहतूक करतात. उर्वरित मुंबई, गुजरात, नागपूर, पुणे, राजस्थान, गोवा, आंध्र प्रदेश, तमिळनाडू, केरळ, पुदुच्चेरी, कर्नाटकातील कामगिरीवर असतात.

ट्रकमध्ये माल भरण्याची व उतरण्याची जबाबदारी संबंधित व्यापारी अथवा साखर कारखानदारांची असताना, ही जबाबदारी ते स्वीकारत नसल्याचे असोसिएशनचे म्हणणे आहे.

त्याचा भार ट्रकधारकांवर पडतो आणि त्यांना जबरदस्तीने मालाची भरणी व उतरणी करावी लागते. ज्याचा माल त्याचा हमाल व ज्याचा माल त्याचा विमा यासंदर्भात साफी भाड्याची अंमलबजावणी करण्यासाठी असोसिएशनने पावले उचलली आहेत. साफी भाडे तत्त्वावर वाहतूक केली जात आहे.

Sugar Transportation
Sugar Market : कारखान्यांना एप्रिलसाठी २५ लाख टनांचा साखर कोटा

साखर कारखानदारांनी नियुक्त केलेल्या कामगारांतर्फे साखरेची भरणी व उतरणी ट्रकमध्ये करायची आहे. तरीही त्याचा भार ट्रकधारकांवर टाकला जात असल्याने, येत्या काही दिवसांत साखरेची वाहतूक बंद करण्याविषयी बैठक घेऊन तसा निर्णय घेण्याची तयारी असोसिएशनची आहे.

याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष जाधव म्हणाले, 'ट्रकधारकांचे प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला जात नाही. त्यांचे भाडे निश्चित केलेले नाही. त्यामुळे तोट्यात हा व्यवसाय करावा लागतो.'

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com