Agriculture Development : परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण

Organic Farming : शेतीतील रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करुन जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादित मालाची प्रत सुधारावी यासाठी सेंद्रीय शेतीच्या विकासावर भर देण्यात येत आहे.
Farmer Training
Farmer Training Agrowon
Published on
Updated on

Akola News : शेतीतील रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर कमी करुन जमिनीचा पोत सुधारावा आणि उत्पादित मालाची प्रत सुधारावी यासाठी सेंद्रीय शेतीच्या विकासावर भर देण्यात येत आहे. त्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेअंतर्गत शेतकरी प्रशिक्षण व मार्गदर्शन सभेचे डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात सेंद्रिय विभागात आयोजन करण्यात आले होते.

यावेळी आत्मा प्रकल्प संचालक डॉ. मुरली इंगळे, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे डॉ. आदिनाथ पसलावार, डॉ. योगेश इंगळे, डॉ. परीक्षीत सिंगरूप, मंडळ कृषी अधिकारी प्रदीप राऊत, अमोल हरणे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

Farmer Training
Agriculture Development : कृषी व्यवसाय विकासाला आता मिळणार चालना

सेंद्रिय शेतीबाबत डॉ. पसलावार यांनी सेंद्रिय खतांच्या निर्मितीसह मुलस्थानी जलसंधारण, पीक नियोजन, आंतरपीक लागवड, सेंद्रिय प्रमाणीकरण मानके, काढणी पश्चात तंत्रज्ञान, साठवणूक, मालाची प्रतवारी, विपणन व्यवस्थापनाबाबत तांत्रिक मार्गदर्शन केले. त्यानंतर डॉ. योगेश इंगळे यांनी शेतकऱ्यांना सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, बीजप्रक्रिया, जीवामृत, बिजामृत अमृतपाणी, निंबोळी अर्क, दशपर्णी अर्क, वनस्पती अर्क, पंचगव्य, कीड व रोग व्यवस्थापनाविषयी सविस्तरपणे मार्गदर्शन केले.

डॉ. शिंगरूप, अमोल हरणे, ईश्वर बोबडे यांनी जैविक लॅब व गांडूळ खत निर्मिती याबाबत प्रक्षेत्र भेट व गांडूळ खत, सेंद्रिय निविष्ठा वापर, बायोडायनीमिक कंपोस्ट, पिक पद्धती,सेंद्रिय खत, गांडूळ खत निर्मिती प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. शेवटी डॉ. मुरली इंगळे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना शेतीमध्ये रासायनिक खते, कीटकनाशके, तणनाशके यांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे.

Farmer Training
Agriculture Development : शेती विकासाला मिळाली संशोधकवृत्ती, कृषी ज्ञानाची जोड

पाण्याचा जास्त वापर, जमिनीची होणारी धूप, एकच पीक वारंवार घेणे, तसेच सेंद्रिय खतांचा वापर पुरेसा प्रमाणात होत नसल्याने जमिनीचा पोत बिघडून जमिनी नापीक होत आहे. पिकांचे उत्पादन कमी होवू लागले आहे.

उत्पादित शेतमालाची प्रतही खालावली असून त्याचा मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी परंपरागत कृषी विकास योजनेंतर्गत सेंद्रिय शेतीला चालना देण्यात येत आहे असे सांगितले.

या प्रशिक्षणासाठी आत्मा यंत्रणेचे तालुका तंत्र व्यवस्थापक व्ही. एम. शेगोकार, साहाय्यक तंत्र व्यवस्थापक सचिन गायगोळ, कृषी साहाय्यक डी. डी .राठोड, प्रशांत वानखडे, कृषी पर्यवेक्षक देवकर आदीसह सेंद्रिय उत्पादक शेतकऱ्यांनी पुढाकार घेतला. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विजय शेगोकार यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com