Jaggery producer : गूळ उत्पादकांसाठी कोल्हापुरात प्रोत्साहन प्रशिक्षण

कोल्हापुरी गुळाला भौगोलिक मानांकन मिळूनदेखील ऊस उत्पादक आणि गूळ उद्योजकांची त्याअनुषंगाने एकजूट दिसून येत नाही.
Jaggery producer
Jaggery producerAgrowon
Published on
Updated on

Kolhapur jaggery producer News : जिल्ह्यातील गूळ (Gul) उत्पादकांसाठी शाहू मार्केट यार्ड येथे एक दिवसीय प्रोत्साहन प्रशिक्षण घेण्यात आले. कृषी विभाग (Agricultural Department), ‘आत्मा’, जिल्हा उद्योग केंद्र, महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळ, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्र (Jaggery Research Center) यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रशिक्षण झाले.

कोल्हापुरी गुळाला भौगोलिक मानांकन मिळूनदेखील ऊस उत्पादक आणि गूळ उद्योजकांची त्याअनुषंगाने एकजूट दिसून येत नाही.

उत्पादकांना दर्जेदार गूळ उत्पादनासाठी आणि राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय बाजारात कोल्हापुरी गुळाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध होण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या मार्गदर्शनाखाली व्यापक कार्यक्रम आखण्यात येत आहे. त्याचीच सुरुवात प्रोत्साहन प्रशिक्षणाच्या माध्यमातून करण्यात आली.

Jaggery producer
Jaggery Market : कोल्हापुरात गूळ सौदे पोलिसांच्या बंदोबस्त झाले सुरू; नव्या गुळाला काय दर मिळाला?

महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाचे कोल्हापूर विभागाचे उपसरव्यवस्थापक डॉ. सुभाष घुले, पंतप्रधान सूक्ष्म खाद्य प्रक्रिया उद्योग उन्नयन योजनेबाबत कंपनी सेक्रेटरी अॅड. अमर पाटील, जिल्हा उद्योग केंद्र व्यवस्थापक संकेत कदम, ‘नाबार्ड’चे जिल्हा विकास प्रबंधक आशुतोष जाधव, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक गणेश गोडसे, अन्न आणि औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त कृष्णात शिंगाडे, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे वरिष्ठ क्षेत्र अधिकारी संजय मोरे, प्रादेशिक ऊस व गूळ संशोधन केंद्राचे वरिष्ठ संशोधन अधिकारी डॉ. बापूराव गायकवाड, कृषी विद्यावेत्ता डॉ. विद्यासागर गेडाम, कृषी विकास अधिकारी बी. एल. पाटील यांनी गूळ उत्पादकांशी संवाद साधला.

गूळ उत्पादक बाळासाहेब पाटील वंदूरकर यांनी उत्पादकांच्या अडचणी मांडल्या. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक ‘आत्मा’ जालिंदर पांगरे, कृषी उपसंचालक रवींद्र पाठक, करवीर तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील आदी उपस्थित होते.

स्वागत तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पराग परीट यांनी केले. निखिल कुलकर्णी यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com