Abdul Sattar : बाजार समिती पदाधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण अभ्यासक्रम : पणनमंत्री सत्तार

Minister of Commerce : पणनमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था येथे भेट देऊन संस्थेच्या कामकाजाची माहिती घेतली.
Abdul sattar
Abdul sattarAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यातील बाजार समितीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पणन मंडळामार्फत तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्र संस्थेत अभ्यासक्रम, प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करण्यात येईल, अशी माहिती पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली.

मंत्री सत्तार यांनी बुधवारी (ता. २३) सायंकाळी तळेगाव येथील महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी पणन संचालक शैलेश कोथमिरे, राज्य कृषी पणन मंडळाचे कार्यकारी संचालक संजय कदम, सरव्यवस्थापक तथा मॅग्नेटचे प्रकल्प संचालक विनायक कोकरे, संस्थेचे संचालक डॉ. सुभाष घुले, मॅग्नेट प्रकल्पाचे उपसंचालक अमोल यादव, संस्थेचे व्यवस्थापक विश्वास जाधव आदी उपस्थित होते.

आढावा बैठकीत श्री. सत्तार म्हणाले, संस्थेने इतर विभागांशी समन्वय साधून, राज्यातील जास्तीत जास्त शेतकरी, अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी यांना संबंधित विषयावरील प्रशिक्षण देण्यावर भर द्यावा. त्याचबरोबर कृषी पणन मंडळाने राज्यातील बाजार समिती यांच्या पदाधिकारी व अधिकारी कर्मचारी यांच्याकरिता राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण आयोजित करावे. यासाठीचा अभ्यासक्रम अद्ययावत करावा. प्रशिक्षणासाठी येणारा खर्च कृषी पणन मंडळाने संस्थेला द्यावा, जेणेकरून संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यास मदत होईल.

त्याचप्रमाणे संस्थेने जिल्हा बँका, नाबार्ड, कौशल्य विकास व अल्पसंख्याक विभागाशी संपर्क साधून संस्थेत पूर्ण वर्षभर प्रशिक्षण कार्यक्रम सुरू राहण्यासाठी प्रयत्न करावेत. संस्थेने आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी उपलब्ध जागेचा पुरेपूर वापर करून नवीन प्रकल्प उभारावेत. संस्थेला पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषद किंवा एमआयडीसी यांच्याकडे संपर्क साधावा, याकरिता आवश्यक ती मदत करता येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले.

श्री. कोथमीरे यांनी राज्यातील बाजार समितीच्या पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रशिक्षणाबाबत परिपत्रक काढण्यात येईल असे सांगितले. श्री. कदम यांनी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, असे सांगितले. या वेळी डॉ. घुले यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com