Traditional Fishing : परप्रांतीय LED मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमार आक्रमक

LED Fishing : परप्रांतीय एलईडी पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी (ता.२९) सहायक मत्स्य आयुक्तांना घेराव घातला.
Fisheries
Traditional FishermanAgrowon
Published on
Updated on

Sindhudurg News : परप्रांतीय एलईडी पर्ससीन मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेत शनिवारी (ता.२९) सहायक मत्स्य आयुक्तांना घेराव घातला. ‘तुम्ही कारवाई करा अन्यथा आम्हाला कारवाई करण्याचे अधिकार द्या,’ अशी मागणी त्यांनी केली.

सिंधुदुर्ग किनारपट्टीवर गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून एलईडी पर्ससीन मासेमारी सुरू आहे. दिवसागणिक त्यांची संख्या वाढत आहे. त्याचा फटका पारंपरिक मासेमारी करणाऱ्यांना बसत आहे. त्यामुळे बेकायदा मासेमारी करणाऱ्यांवर कारवाई करावी या मागणीकरिता पारंपरिक मच्छीमारांनी मालवण येथील सहायक मत्स्य आयुक्तांच्या कार्यालयाला धडक दिली. यामध्ये मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष मिथुन मालंडकर, उपाध्यक्ष भाऊ मोर्जे, बाबी जोगी, आबा वाघ, महेश कोयंडे, जगदीश खराडे, अन्वय प्रभू यांच्यासह शेकडो मच्छीमारांनी सहायक मत्स्य आयुक्त सागर कुवसेकर यांना घेराव घातला.

Fisheries
Fish Price: मासळीच्या दरात झपाट्याने वाढ! उन्हाळी पर्यटनामुळे मागणी वाढली

पर्ससीनधारकांना समुद्रकिनारी धुडगूस घातला आहे. आमच्या तोंडचा घास ते पळवून नेत आहेत आणि तुम्ही कार्यालयात बसून काम करीत आहात अशा शब्दांत त्यांची कानउघाडणी केली. तुम्हाला कारवाई जमत नसेल तर आम्हाला कारवाईचा अधिकार द्या आम्ही कारवाई करतो, अशी मागणी देखील त्यांनी केली.

Fisheries
Cage Fish Farming: पुण्यात पिंजरा मत्स्यसंवर्धन कार्यशाळा; मत्स्यव्यवसायात नवे तंत्र!

या वेळी श्री. कुवसेकर यांनी तातडीने अनधिकृत मासेमारी नौकांवर कारवाई करण्यात येईल असे आश्‍वासन दिले. आचरा आणि देवगड बंदरात राजरोस पर्ससीन बोटीचा वापर होत आहे. पर्ससीन परवाने नूतनीकरण झालेले नाहीत.

तरीदेखील ते किनाऱ्यावर कसे काय राहतात, असा देखील प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला. आश्‍वासन करण्याची हमी दिल्यानंतर पारंपरिक मच्छीमारांनी आंदोलन स्थगित केले. परंतु जर येत्या आठ दिवसांत कारवाई केली गेली नाही तर आंदोलन छेडू, असा इशारा देखील मच्छीमार कृती समितीने दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com