ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. सोनाली लोखंडे, Smart Farming: शेतीमध्ये फळबागा व इतर नगदी पिकांवर कीड-रोगांच्या नियंत्रणासाठी फवारणी हा एक अपरिहार्य भाग आहे. साधे एसटीपी पंप, एचटीपी किंवा पारंपरिक एअर-ब्लोअर यासारख्या पारंपरिक फवारणी पद्धतींमध्ये हवेत रसायने उडून जाणे आणि जमिनीवर थेंबाथेंबाने गळून वाया जाणे असे प्रकार घडतात. पारंपरिक पद्धतीची दुसरी समस्या अशी, की रसायनाचा थर केवळ झाडांच्या वरच्या पृष्ठभागावर बसतो आणि कीड, बुरशी यांचा रहिवास पानांच्या खालील बाजूला असू शकतो. या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी ट्रॅक्टरचलित इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअर हे तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान भौतिकशास्त्रातील स्थिर विद्युत तत्त्वाचा वापर करून रसायनांचे सूक्ष्म थेंब झाडांच्या प्रत्येक पानावर ३६० अंशांत अचूकपणे चिटकवते..कार्यपद्धतीविद्युतभार निर्मिती : जेव्हा रसायनांचे द्रावण नोजलमधून बाहेर पडते, तेव्हा नोजलमध्ये असलेल्या इलेक्ट्रोड रिंगद्वारे त्या थेंबांवर ऋण प्रभार दिला जातो.आकर्षण शक्ती : निसर्गतः वनस्पती, झाडांची पाने आणि खोड हे धन प्रभारित किंवा जमिनीशी जोडलेले असतात. रसायनावर दिलेला ऋण प्रभार आणि झाडांमध्ये असलेला धन प्रभार अशा विरुद्ध प्रभारामुळे द्रावणाचे सूक्ष्म थेंब चुंबकासारखे पानांच्या वरच्या, खालच्या बाजूला, देठांवर आणि फळांवर सर्व बाजूंनी घट्ट चिटकतात. हवेचा वेग असला तरी थेंब भरकटत नाहीत आणि जमिनीवर गळत नाहीत..Tractor Boom Sprayer: ट्रॅक्टरचलित बूम स्प्रेअर.नोजल प्रणालीइलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरमध्ये सामान्य नोजल्स चालत नाहीत. यासाठी उच्च तंत्रज्ञानावर आधारित एअर-असिस्टेड इलेक्ट्रोस्टॅटिक नोजल्स वापरली जातात.सूक्ष्म थेंबांची निर्मिती : ही नोजल्स रसायनाचे ३० ते ५० मायक्रॉन आकाराचे अतिसूक्ष्म थेंब तयार करतात.अँगल कंट्रोल्ड आणि एअर-असिस्टेड डिझाइन : नोजलच्या तोंडाशी हवेचा तीव्र दाब दिला जातो. त्यामुळे थेंब नोजलच्या बाहेर पडताच हवेच्या झोतासोबत झाडाच्या दाट पालापाचोळ्यात खोलवर पोहोचतात..इंडक्शन चार्जिंग इलेक्ट्रोड : नोजलच्या आतील भागात सिरेमिक किंवा स्टेनलेस स्टीलच्या इलेक्ट्रोड रिंग्स असतात. त्यांच्यामुळे द्रवाच्या सूक्ष्म कणांना हाय-व्होल्टेज (परंतु सुरक्षित मिली-अँपिअर) प्रभार देतात.ड्युएल-चार्ज्ड प्रभार क्षमता : रसायनाचा थेंब नोजलबाहेर पडताच तो पूर्णतः प्रभारित होतो. जवळच्या सर्व थेंबावर ऋण भार असल्याने ते एकमेकांना दूर लोटतात. द्रावणाचे एकसमान धुके तयार होऊन पानांवर पातळ थर निर्माण होतो. ते पानावर मोठे थेंब बनून साचत नाहीत..Modern Fruit Plantation: फळझाडे लागवडीसाठी आधुनिक यंत्रे.यंत्राची रचना२४ ते ४५ एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर इलेक्ट्रोस्टॅटिक स्प्रेअरच्या प्रभावी कार्यासाठी पुरेसा ठरतो. साधारणपणे ट्रॅक्टर क्षमता ही स्प्रेअरच्या टाकीचा आकार (क्षमता), ब्लोअरचा आकार आणि पिकांच्या प्रकारावर अवलंबून असते.पॉइंट लिंकेज व मुख्य फ्रेम : ट्रॅक्टरच्या मागील बाजूस सुरक्षितपणे जोडण्यासाठी मजबूत फ्रेम.रसायनाची टाकी : २०० ते ६०० लिटर क्षमतेची केमिकल-रेझिस्टंट पॉली किंवा फायबर टाकी..पीटीओ शाफ्ट आणि एअर कॉम्प्रेसर/ब्लोअर युनिट : ट्रॅक्टरच्या पॉवरवर चालणारा हाय-प्रेशर एअर ब्लोअर.हाय-व्होल्टेज पॉवर जनरेटर युनिट : इलेक्ट्रोडला चार्ज पुरवणारे कॉम्पॅक्ट इलेक्ट्रॉनिक युनिट.बूम आणि एअर डक्ट्स : झाडांच्या उंचीनुसार किंवा पिकांनुसार ॲडजस्ट करता येणारे पंख.प्रेशर रेग्युलेटर व कंट्रोल व्हॉल्व्ह : पाण्याचा व हवेचा प्रवाह ट्रॅक्टर चालकाच्या सीटवरून नियंत्रित करण्याची सोय..पिकांसाठी उपयुक्तफळबागा : संत्रा, मोसंबी, डाळिंब, द्राक्षे, पेरू, आंबा, सफरचंद, लिंबूवर्गीय फळे.भाजीपाला पिके : टोमॅटो, वांगी, मिरची, सिमला मिरची, काकडी, कोबी, फ्लॉवर.नगदी पिके : कपाशी (बोंड अळी व रसशोषक किडींसाठी), तूर, सोयाबीन..फायदेरसायनाची बचत : रसायने पानांची चिकटून राहत असल्याने गळून वाया जात नाहीत. त्यांची कार्यक्षमता वाढते. कमी मात्रेत कीडरोगाचे संपूर्ण नियंत्रण मिळू शकते.पाण्याची बचत : एकरी लागणारे पाणी ४०० लिटरवरून अवघ्या १०० ते १५० लिटरवर येते.३६० अंश संपूर्ण कव्हरेज : पानांच्या मागच्या बाजूला लपलेल्या किडींपर्यंत रसायने पोहोचू शकतात.मजुरी व वेळेची बचत : एकाच फेरीत दोन्ही बाजूंच्या झाडांवर जलद फवारणी होते..मर्यादापाण्याची गुणवत्ता : नोजल अत्यंत बारीक असल्याने गाळलेले व स्वच्छ पाणीच वापरावे लागते.नियमित स्वच्छता : फवारणी संपल्यावर दरवेळी नोजल्स स्वच्छ पाण्याने फ्लश करावी लागतात.सुरुवातीचा खर्च : पारंपरिक यंत्रांच्या तुलनेत किंमत अधिक असते.- ज्ञानेश्वर ताथोड ९६०४८१८२२०कृषी शक्ती व अवजारे विभाग, डॉ. पंजाबराव देषमुख कृषी विद्यापीठ, अकोला.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.