Katepurna Wildlife Sanctuary : श्रावणात ‘काटेपूर्णा’ अभयारण्यात पर्यटकांची गर्दी

Tourism Update : श्रावण महिन्यात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेवर विस्तारलेले काटेपूर्णा अभयारण्य सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे.
Katepurna Wildlife Sanctuary
Katepurna Wildlife SanctuaryAgrowon
Published on
Updated on

Washim News : श्रावण महिन्यात वाशीम-अकोला जिल्ह्याच्या सीमेवर विस्तारलेले काटेपूर्णा अभयारण्य सध्या पर्यटकांना आकर्षित करीत आहे. ७३.६९ वर्ग किलोमीटर क्षेत्रात पसरलेल्या विस्तीर्ण काटेपूर्णा अभयारण्यात पर्यटकांची मोठी गर्दी होत होताना दिसत आहे.

काटेपूर्णा प्रकल्पात बोटिंगचा आनंद घेण्यासाठी पर्यटक उत्सुक असतात. स्वातंत्र्य दिनापासून येथील बोटिंग सुरू करण्यात आली आहे. हा आनंद घेण्यासाठी पर्यटक एकच गर्दी करू लागले आहेत.

Katepurna Wildlife Sanctuary
Rain Alert : कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात ‘ऑरेंज अलर्ट’

काटेपूर्णा अभयारण हे जैवविविधतेचे एक अद्भुत उदाहरण आहे. येथे असंख्य पक्षी, प्राणी आणि वनस्पतींच्या प्रजाती आढळून येतात. पर्यटकांना ट्रेकिंग, बर्ड वॉचिंग, वन्यजीवन निरीक्षण आणि फोटोग्राफीचा आनंद घेता येतो. अभयारण्यातील निरव शांतता आणि निसर्गाची सुंदरता पर्यटकांना भावते आहे. श्रावण महिन्यात येथील हवामानही पर्यटकांना आकर्षित करते. थंड हवा आणि हिरवळीने नटलेला निसर्ग पर्यटकांना एक वेगळा अनुभव देतो.

Katepurna Wildlife Sanctuary
Rabi Jowar Farming : जमिनीच्या खोलीनुसार पेरा रब्बी ज्वारीचे वाण
अत्यंत निसर्गरम्य असलेल्या या अभयारण्यात पर्यटकांना निसर्गाची जवळून अनुभूती घेता येते. या ठिकाणी पर्यटकांसाठी सर्व प्रकारच्या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पर्यटक, निसर्गप्रेमी यांनी एक वेळा काटेपूर्णा अभयारण्याला भेट देऊन, येथील निसर्ग सौंदर्य, जैवविविधतेचा निश्‍चितच अनुभव घ्यावा.
पवन जाधव, वनपरिक्षेत्र अधिकारी काटेपूर्णा अभयारण्य

पर्यटनाच्या सुविधा

काटेपूर्णा जलाशयाच्या कडेला टेकडीवर नैसर्गिक निवास विकसित केले आहे. काटेपूर्णा जलाशयाच्या काठावरून फिरण्यासाठी निसर्ग वाट तयार केली आहे. यावर माहितीचे फलक लावले आहेत. अभयारण्यात फिरण्यासाठी जिप्सीची सुविधा आहे. रिव्हर व्ह्यू पॉइंट, चाका पॉइंट, पांडव लेणी, घारीचा आसोडा, कळंबाचा गवताळ प्रदेश, वाघाडोह या प्रदेशातून वन्यप्राण्यांचे दर्शन होते. या ठिकाणी काटेपूर्णा अभयारण्यातील जैवविविधतेची माहिती सचित्र रूपात दिलेली आहे. अलीकडेच या केंद्राचे नूतनीकरण करण्यात आले आहे. याशिवाय बालोद्यानही आकर्षणाचे केंद्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com