
Tomato Onion Prices : कोल्हापूर बाजारात भाजीपाल्याच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. याचा परिणाम टोमॅटो, कांद्याच्या दरावर दिसून येत आहे. कांद्याच्या क्विंटलला ५०० रूपयांची वाढ झाली आहे तर टोमॅटाच्या दरातही दर्जानुसार ५०० ते १ हजार रुपयांची वाढ झाली आहे. मागणी असल्याने हे वाढीव दर नववर्षापर्यंत कायम राहतील, असे व्यापाऱ्यांनी सांगितले. हंगामी ओल्या वाटाण्याची आवक सुधारल्याने दर उतरू लागले आहेत.
गाजराच्या हंगामात परराज्यातील नवीन आवक सुरू झाली आहे. दिसायला भडक आणि लांबलचक असणाऱ्या या गाजरांना हलव्यासाठी मागणी आहे. फळ बाजारात घटलेल्या स्ट्रॉबेरीसह अंजीराची आवक जोमात सुरू झाली आहे. नागपूर संत्र्यांची आवक अंतिम टप्प्यात आहे. मार्गशीर्ष महिना संपल्याने व पौष महिना सुरू असल्याने फूल बाजाराचा भाव पडला आहे. फुलांना सध्याचे वातावरण अनुकूल ठरत असल्याने उत्पादनही वाढले आहे. याचा गंभीर परिणाम दरावर होत आहे.
प्रतिकिलो रुपये - भाज्यांचे दर : टोमॅटो-३० ते ३५, दोडका- ५० ते ६०, वांगी - ५० ते ७०, कारली - ३० ते ४०, ढब्बू मिरची - ४० ते ५०, मिरची - ४० ते ५०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- २० ते ३०, बटाटा- ४० ते ५०, कांदा - ४५ ते ५०, लसूण- ३०० ते ३५०, आले - ८० ते १००, लिंबू - १५० ते ४०० शेकडा, गाजर - ६० ते ८०, बिन्स - ५० ते ६०, गवार - ८० ते १००, भेंडी- ६० ते ८०, ओला वाटाणा - ८० ते ९०, देशी काकडी- ७० ते ८०, काटा काकडी - ४० ते ५०, दुधी - ३० ते ४०, भाज्या - ८ ते १० पेंढी, शेवगा - १५ ते २० रुपये नग.
फुले : झेंडू - १०० ते १२०, निशिगंध - १२० ते १५०, गुलाब - ३०० ते ३२०, गलांडा - १२० ते १५०, शेवंती - १०० ते १५०, आष्टर - १५० ते १८०.
फळे : सफरचंद - १५० ते ३५०, संत्री - ७० ते ८०, मोसंबी- ८० ते १००, डाळिंब- १२० ते २००, चिकू- १०० ते १२०, पेरू - ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ६० ते १००, मोर आवळा -१२० ते २००, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ८० ते १०० डझन, किवी - १०० ते १२०, ड्रॅगन- १५० ते २००, स्ट्रॉबेरी -४०० ते ५००, चिंच- १०० ते १४०, अननस -४० ते ५०.
खाद्यतेल : सरकी - १३३ ते १३८, शेंगतेल - १९० ते १९५, सोयाबीन - १३३ ते १४०, पामतेल - १४५ ते १५०, सूर्यफूल - १४५ ते १५०.
कडधान्य : हायब्रीड ज्वारी- २८ ते ३५, बार्शी शाळू- ३० ते ५०, गहू - ३५ ते ४४, हरभराडाळ - ८० ते ८५, तूरडाळ- १५० ते १६०, मूगडाळ -१०० ते ११०, मसूरडाळ - ७७ ते ७८, उडीदडाळ - १२० ते १२५, हरभरा - ७८, मूग- ९२ ते १००, मटकी- ९५ ते १००, मसूर - ७० ते ७२, फुटाणाडाळ - १०५ ते ११०, चवळी - ९० ते १२५, हिरवा वाटाणा- १७५, छोला -१२० ते १५०.
धान्य बाजारातील डिमांड घटले
नवीन आवक सुरू झाली असून तांदळाचे दर प्रतिकिलो ७ ते ८ रुपयांनी कमी झाले आहेत. तरीही अपेक्षित उलाढाल धान्य बाजारात होताना दिसत नाही. दरवर्षीच्या तुलनेत सध्या डिमांड ३० ते ३५ टक्क्यांनी कमी झाल्याचे धान्य व्यापाऱ्यांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.