
Solapur News : शक्तिपीठ महामार्गाला विरोध होत असूनही प्रशासनाने अत्यंत आवश्यक कामात या महामार्गाचा समावेश केला आहे. पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या टप्प्यासाठी तीन प्रारूप आराखडे तयार करण्यात आले असून कोल्हापूर, सांगली, सोलापूर जिल्ह्यातील १३६ गावांना फटका बसणार आहे. विशेष म्हणजे या महामार्गाला प्रचंड विरोध करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्याचाही या अलाइनमेंटमध्ये समावेश आहे.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्रधिकरणने पर्यावरण विभागाच्या ना हरकत प्रमाणपत्रासाठी या महामार्गाचे तीन वेगवेगळे प्रारूप आराखडे (अलाईनमेंट) तयार केले आहेत. पर्यावरण विभागाच्या नागपूर येथील कार्यालयाकडे महाराष्ट्र रस्ते विकास प्रधिकरणने सादर केलेल्या ४८ पानी अहवालातून प्रथमच या महामार्गाची सर्वाधिक तपशीलवार माहिती समोर आली आहे.
पहिल्यात टप्प्यात सोलापूर जिल्ह्याच्या पाच तालुक्यातील ५५ गावे सांगली जिल्ह्याच्या चार तालुक्यातील १८ गावे तर कोल्हापूर जिल्ह्याच्या ६ तालुक्यातील ६१ गावे तसेच उर्वरित धाराशिव जिल्हा मराठवाड्याच्या टप्प्यात येत असला तरी तुळजापूर तालुक्यातील दोन गावे पहिल्या टप्यात येत आहेत. पहिल्यासाठी तीन वेगवेगळ्या अलाइनमेंट तयार करण्यात आल्या आहेत. यामध्ये एकूण १३६ गावे बाधित होणार असून १३४ गावे पश्चिम महाराष्ट्रातील तर दोन गावे मराठवाड्यातील तुळजापूर तालुक्यातील आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील बाधित गावे
बार्शी तालुका- गौडगाव, रातजंन, मालेगाव, आंबाबाइचीवाडी, जवळगाव, हत्तीज, चिंचखोपण, शेळगाव (आर.) उत्तर सोलापूर- कौठाळी, कळमण, पडसाळी, मोहोळ तालुका- मसलेचौधरी, खुनेश्वर, भोयरे, हिंगणी (निपाणी) मोहोळ, पोखरापूर, आढेगाव, सौंदणे, टाकळी सिकंदर, पंढरपूर तालुका- पुळुज, फुलचिंचोली, विटे, खरसोळी, आंबे, अनावळी, सातेफळ, खर्डी, सांगोला तालुका - मतेवाडी, संगेवाडी, मांजरी, देवकतेवाडी, चिंचोळी, बामणी, एखतपूर, सांगोला, कमलापूर, अजनाळे, चिनके, वझरे, बाळेवाडी, नाझरेवाडी, चोपडे आदी.
महामार्गाची वैशिष्ट्ये
पवनार ते पत्रादेवीपर्यंत सहापदरी महामार्ग
रेणुकादेवी, तुळजाभवानी, अंबाबाई ही शक्तिपीठ जोडणार
महामार्गावर दर पन्नास किलोमीटर हॉटेल्स, धाबे, चार्जिंस्टेशची सुविधा
धार्मिक पर्यटन वाढ व उद्योगवाढ हे ध्येय
पहिल्या टप्प्याचा तपशील
एकूण आवश्यक जमीन ३७९० हेक्टर
खासगी शेत जमीन ३६१९.२२ हेक्टर
वन विभागाची जमीन १९.४४ हेक्टर
सरकारी जमीन १५२.०३ हेक्टर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.