Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Vidhansabha Election Update : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात महायुतीने आठही जागांवर आघाडी घेतली आहे.
Satara Vidhansabha Result
Satara Vidhansabha ResultAgrowon
Published on
Updated on

Satara News : काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात महायुतीने आठही जागांवर आघाडी घेतली आहे. तीन मतदार संघांत दिग्गज नेत्यांचा पराभव करत मनोज घोरपडे, अतुल भोसले, सचिन पाटील हे ‘जाएंट किलर’ ठरले आहेत.

सातारा-जावळी मतदार संघातील आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मताधिक्याचे सर्व विक्रम मोडीत काढत एक लाख ४२ हजारांनी मताधिक्यांनी एकहाती विजय मिळवला आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

Satara Vidhansabha Result
Satara Vidhansabha Election 2024 : सातारा जिल्ह्यात चुरशीने ७१.९५ टक्के मतदान

शिवेंद्रसिंहराजेंच्या मोजणीच्या अखेरच्या फेरीत एक लाख ७५ हजार ६२ इतकी, तर त्‍यांचे निकटचे प्रतिस्‍पर्धी अमित कदम यांना ३४ हजार ९४२ मते मिळली. कऱ्हाड दक्षिण मध्ये अतुल भोसले (कमळ) यांनी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण धक्का देत ३९ हजार ३५५ मताधिक्क्याने पराभव केला. कऱ्हाड उत्तर मध्ये माजीमंत्री बाळासाहेब पाटील (तुतारी) यांचा मनोज घोरपडे (कमळ) यांनी ४३,६९१ हजार इतक्या मताधिक्याने पराभव केला.

पाटणमध्ये शंभूराज देसाई (धनुष्यबाण) महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षद कदम, अपक्ष सत्यजितसिंह पाटणकर यांना दारुण पराभवाचा सामना करावा लागला. श्री. देसाई यांनी ३४,८२६ मताधिक्याने विजय संपादन केला. फलटण कोरेगाव मतदार संघात राजे गटाचा पराभव झाला आहे.

Satara Vidhansabha Result
Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

सचिन पाटील (घड्याळ) यांनी १७,०४६ मताधिक्यांनी विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचा पराभव केला. माण-खटावमध्ये आमदार जयकुमार गोरे (कमळ) यांनी प्रभाकर घार्गे (तुतारी) यांचा ४९,४७८ मताधिक्यांनी पराभव केला आहे. वाईमध्ये आमदार मकरंद पाटील (घड्याळ) यांनी अरुणादेवी पिसाळ (तुतारी) यांचा ६१ हजार ३९२ मताधिक्यांनी पराभव केला.

पाटील या विजयाने चौथ्यावेळी आमदार झाले आहेत. कोरेगावमध्ये महेश शिंदे (धनुष्यबाण) यांनी शशिकांत शिंदे (घड्याळ) यांच्या विरोधात सुरुवातीच्या फेरीपासून आघाडी घेतली होती. महेश शिंदे यांना ४३,३२५ (पोस्टल मतदान वगळून) मताधिक्य मिळाले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com