Crop Insurance : गडचिरोलीत हजारांवर शेतकऱ्यांना मिळाली ८३ लाखांची भरपाई

Crop Insurance Compensation : नुकसानीनंतर तब्बल एक हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात ८२.३८ लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Gadchiroli News : एक रुपयात पीकविमा योजनेला दुर्गम आणि नक्षलप्रवण गडचिरोली जिल्ह्यातही प्रतिसाद मिळाला. नुकसानीनंतर तब्बल एक हजारावर शेतकऱ्यांच्या खात्यात ८२.३८ लाख रुपये वर्ग करण्यात आल्याने शेतकऱ्यांमध्येही समाधान आहे.

शासनाने एक रुपयात पीकविमा योजना जाहीर केली. त्याला शेतकऱ्यांनी व्यापक प्रतिसाद दिला. जिल्ह्यात गेल्या खरिपात तब्बल एक लाख २६ हजार ७४९ शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला होता. परंतु हंगामात चांगल्या पाऊसमानामुळे पिकाचे फारसे नुकसान झाले नाही. परिणामी, जिल्ह्यातील केवळ १ हजार ७९ शेतकऱ्यांनाच एकूण ८२.३८ लाख रुपयांची भरपाई मिळाली.

Crop Insurance
Crop Insurance : विमा हप्ता ३८२ कोटी रुपये, मात्र परतावा मिळाला ४८ कोटी

जिल्हयात २०२३-२४ या खरीप हंगामात १ लाख २६ हजार ७४९ शेतकऱ्यांनी पंतप्रधान विमा योजनेचा लाभ घेत पीक संरक्षित केले. या शेतकऱ्यांनी संरक्षित केलेले क्षेत्र १ लाख २० हजार ८३७ हेक्‍टर होते. गेल्या काही वर्षांच्या तुलेनत पीकविमा काढणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या पाच पटीने वाढली. मात्र पीक परिस्थिती चांगली असल्याने जिल्ह्यातील सर्वच गावांची पैसेवारी ५० पेक्षा अधिक होती. त्यामुळे अनेकांना विमा भरपाई मिळाली नाही.

२०२३-२४ या खरीप हंगामात ४ हजार १५७ शेतकऱ्यांकडून विमा कंपनीला पूर्वसूचना देण्यात आल्या होत्या. यातील ३ हजार ३७४ शेतकऱ्यांच्या पिकांचे काढणीपश्‍चात नुकसान झाले होते. नैसर्गिक आपत्तीमुळे १६४ शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले.

Crop Insurance
Crop Insurance : विमा कंपनी कार्यालयांत शेतकऱ्यांना प्रतिसाद मिळेना

या शेतकऱ्यांना ११.९१ लाख रुपये भरपाई देण्यात आली. काढणीपश्‍चात नुकसान झालेल्या ९१५ शेतकऱ्यांना ७०.३९ लाख रुपयांची भरपाई मंजूर करण्यात आली. एकूण १ लाख ७९ शेतकऱ्यांसाठी ८२.३८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आली आहे.

३१ हजार शेतकरी मदतीविना

जिल्ह्यातील ३१ शेतकऱ्यांची भरपाई प्रलंबित आहे. या शेतकऱ्यांना ०.१५ लाखांची भरपाई मिळणार आहे. त्यातही उल्लेखनीय बाब म्हणजे जिल्ह्यात भरपाईच्या अनुषंगाने केवळ दोनच शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या आहेत. अन्य वर्षाच्या तुलनेत त्या अत्यल्प आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com