Crime News
Crime NewsAgrowon

Crime News : शेतकऱ्याच्या ‘फोन पे’वरून पैसे लंपास करणारे जेरबंद

७ एप्रिल रोजी अमर गाडे हे त्यांच्या शेतातील खरबूज घेऊन सोलापुरातील बाजार समितीत आले होते.
Published on

Solapur News : सोलापूर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत खरबूज विकायला आलेल्या अमर अर्जुन गाडे (रा. सोनारी, ता. परंडा) यांच्या खिशातील मोबाईल चोरून त्यावरील ‘फोन पे’तून ९८ हजार ४५० रुपये लंपास करणाऱ्या दोघांना जेलरोड पोलिसांनी जेरबंद केले आहे.

योगेश ऊर्फ छोट्या काल्या राजू सल्ला (रा. रविवार पेठ, यशोदा झोपडपट्टी) व संदीप गायकवाड (रा.पंचशील नगर, कुमठा नाका) अशी संशयितांची नावे आहेत.

७ एप्रिल रोजी अमर गाडे हे त्यांच्या शेतातील खरबूज घेऊन सोलापुरातील बाजार समितीत आले होते. व्यापारी आशिफ नजीर अहमद बागवान यांच्या दुकानासमोर चारचाकी लावून पहाटे पाचच्या सुमारास गाडीत झोपले होते.

Crime News
Solapur News : सोलापूर जिल्ह्यात ‘हागणदारीमुक्ती’चा फज्जा

त्या वेळी चोरट्यांनी त्यांच्या खिशातील मोबाईल चोरून नेला होता. त्यानंतर त्यावरील ‘फोन पे’मधून रोकड काढली होती.

८ एप्रिलला जेलरोड पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी संशयितांच्या तपासासाठी पथक तयार केले. मोबाईलचा तांत्रिक तपास व सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांना हेरले.

त्यानंतर दोन संशयित तरुण बाजार समितीत फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संदीप गायकवाड व योगेश सल्ला याला पकडले. त्या वेळी पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

चोरलेल्या पैशातून संशयितांनी मधला मारुती परिसरातील सराफ दुकानातून सोन्याची अंगठी, जुना विजापूर नाका येथील सराफ दुकानातून सोन्याची चेन विकत घेतली. तुळजापूर येथील सराफ दुकानातून सोन्याचे बदाम व चेन खरेदी केली, ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com