Agriculture Future : ...अशी असेल भविष्यातील शेती

Agriculture : भविष्यातील शेती अधिक सक्षम, उत्पादक, कार्यक्षम, आकर्षक व शाश्‍वत करण्यासाठी कृषीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी तंत्र विकसित करण्यावर भर देणे गरजेचे आहे.
Future Agriculture
Future AgricultureAgrowon
Published on
Updated on

Future of Agriculture : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरीद्वारे २० आणि २१ डिसेंबर, २०२३ ला जागतिक बँक अनुदानित भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली (ICAR) प्रायोजित राष्ट्रीय कृषी उच्च शिक्षण प्रकल्प (National Agricultural Higher Education Project- NAHEP) अंतर्गत विद्यापीठामध्ये कार्यरत असलेल्या हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनच्या (Climate Smart Agriculture and Water Management- CSAWM)

आधुनिक कृषी विज्ञान व तंत्रज्ञान केंद्राच्या (Centre for Advanced Agricultural Science and Technology - CAAST) माध्यमातून ‘भविष्यातील शेती’ संदर्भात आंतरराष्ट्रीय कॉन्क्लेव्ह आयोजित करण्यात आली. सदर आंतरराष्ट्रीय कॉन्क्लेव्हमध्ये एकाच वेळी सहा आंतरराष्ट्रीय परिषदा (International Conference) आयोजित करण्यात आल्या. त्या पुढीलप्रमाणे,

कृषीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता व अतिवर्णकृमीय प्रतिमेचा वापर (Artificial Intelligence and Hyperspectral Imaging for Agriculture)

कृषीमध्ये ड्रोनचा वापर (Drones for Agriculture)

कृषीमध्ये यंत्रमानवाचा वापर (Robotics for Agriculture)

कृषीसाठी इंटरनेट ऑफ थिंग्स वापर (Internet of Things - IoT for Agriculture)

संरक्षित वातावरणातील शेती (Indoor Farming)

अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञान (Advanced Agricultural Technologies)

Future Agriculture
Future Agriculture : भविष्यातील शेतीचा वेध घेताना...

या सहा परिषदांमध्ये एकाच वेळी थेट प्रक्षेपण आयोजित करण्यात आल्या. अशाप्रकारे कृषी संदर्भातील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर बहुधा प्रथमच एकाच वेळी सहा प्रत्यक्ष आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित करून त्यात थेट प्रक्षेपणाद्वारे जगभरातील इच्छुकांना सहभागी होण्याची संधी मिळाली असावी.

देश विदेशातील सुमारे २५० पेक्षा जास्त प्रतिनिधींनी यात प्रत्यक्ष सहभाग घेतला. आणि १२५ पेक्षा जास्त तज्ज्ञांनी कृषीमधील अत्याधुनिक तंत्रज्ञानावर सादरीकरण व चर्चा केली.

या परिषदांमध्ये भविष्यातील शेती अधिक सक्षम, उत्पादक, कार्यक्षम, आकर्षक व शाश्‍वत करण्यासाठी नैसर्गिक साधन संपत्ती तसेच शेतीमध्ये आवश्यक असणाऱ्या विविध निविष्ठांचा वापर इष्टतमपणे करणे आवश्यक आहे.

त्यासाठी कृषीमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्यासाठी तंत्र विकसित करण्यावर भर देण्यात आला. या तंत्रज्ञानामध्ये संवेदके, इंटरनेट ऑफ थिंग्स, कृत्रिम बुद्धिमत्ता, संगणकीय प्रारूप, मोबाइल ॲप्लिकेशन्स, निर्णय समर्थन प्रणाली, स्वायत्त यंत्रे व अवजारे, यंत्रमानव, अतिवर्णकमीय प्रतिमा इत्यादींच्या वापरांसोबतच यापैकी एक किंवा अधिक तंत्रज्ञानाचा उपयोग उपग्रह व ड्रोन स्थापित कॅमेऱ्यांसोबत करण्याचा अंतर्भाव आहे.

उपग्रह व ड्रोन स्थापित कॅमेऱ्यांद्वारे घेतलेल्या अतिवर्णकमीय प्रतिमांचे कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे पृथक्करण करून अवकाशामधील साधनांद्वारे (उपग्रह व ड्रोन स्थापित कॅमेरे) पृथ्वीवरील शेतजमिनीच्या व्यवस्थापनाचे निर्णय अधिक काटेकोरपणे घेता येणे शक्य आहे. त्यास क्लाउड स्थापित संगणकीय प्रारूप निर्णय समर्थन प्रणाली, इंटरनेट ऑफ थिंग्स, यंत्रमानव इत्यादी तंत्रज्ञानाची जोड देऊन घेतलेल्या निर्णयाची कार्यवाही सुद्धा काटेकोरपणे करणे शक्य आहे.

आव्हानात्मक अवकाशातील शेती :

पृथ्वीच्या पलीकडील वातावरणात, जसे की अंतराळ स्थानक, इतर उपग्रह किंवा अवकाशयान यामध्ये सूक्ष्म गुरुत्वाकर्षण किंवा कमी गुरुत्वाकर्षण परिस्थितीमध्ये करावयाची शेती म्हणजेच

‘अवकाशातील शेती’. अर्थातच यामध्ये अनेक आव्हाने आहेत, जसे की -

पृथ्वीवरील वनस्पतीच्या मुळांची तसेच शारीरिक वाढ ही गुरुत्वाकर्षणावर अवलंबून असते. पण अवकाशातील सूक्ष्म किंवा कमी गुरुत्वाकर्षण वातावरणात या प्रक्रिया विस्कळीत होण्याची शक्यता अधिक आहे. त्यासाठी अशा परिस्थितीत वनस्पती वाढीची प्रक्रिया अनुकूल करण्यासाठी प्रणाली विकसित करणे आवश्यक आहे.

Future Agriculture
Future of Agriculture: भविष्यातील शेती कशी असेल?

संसाधने व निविष्ठांचा जागेच्या व उपलब्धतेच्या कमतरतेमुळे पुनर्वापर करणे आवश्यक आहे. म्हणजेच वनस्पती वाढ प्रणालीच्या एका भागातील टाकाऊ उत्पादने दुसऱ्या प्रणालीसाठी संसाधने म्हणून वापरल्या जाऊ शकतात. उदा. वनस्पतीमधील टाकाऊ पदार्थांचा वनस्पतीच्या वाढीसाठी अन्नद्रव्य म्हणून पुनर्वापर करणे.

अवकाशामध्ये मर्यादित संसाधने असल्यामुळे जल, अन्नद्रव्य व ऊर्जा यांचा कार्यक्षम वापर करणे आवश्यक आहे. यासाठी वनस्पती मातीशिवाय अन्नद्रव्ययुक्त जल किंवा हवा वापरून वाढविता येतील असे हायड्रोपोनिक्स किंवा एरोपोनिक्स तंत्र विकसित करणे आवश्यक आहे.

मर्यादित नैसर्गिक सूर्यप्रकाशात वनस्पतींच्या वाढीसाठी अवकाशात कृत्रिम प्रकाश योजना विकसित करणे आवश्यक आहे. यासाठी प्रकाश ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी व इष्टतम वनस्पती वाढीसाठी आवश्यक असणाऱ्या तरंग लांबीच्या प्रकाशाचाच विचार केला जाऊ शकतो.

अवकाशातील शेतीसाठी वनस्पतीच्या विशिष्ट प्रजाती विकसित करणे आवश्यक आहे. जसे की जलद वाढणारी, वेगवेगळ्या परिस्थितीत वाढीसाठी लवचीक आवश्यकच पोषणमूल्य असणारी व सूक्ष्म किंवा कमी गुरुत्वाकर्षण परिस्थितीत वाढीस अनुकूल असणाऱ्या वनस्पती प्रजाती.

अवकाशातील शेतीची गरज

सद्यपरिस्थितीमध्ये अवकाशामध्ये शेती करून पोषक मूलद्रव्ये युक्त अन्नधान्य निर्मिती करण्यासाठी संशोधन सुरू आहे. या संशोधनाचा मुख्य उद्देश अवकाशयानामध्ये कित्येक महिने प्रवास करणाऱ्या अंतराळवीरांच्या किंवा अवकाश स्थानकात काम करणाऱ्या अंतराळवीरांची अन्नाची गरज भागविणे इतकाच आहे. पण अवकाशात शेती करण्याऐवजी अवकाशातून शेती करण्याच्या संकल्पनेस आधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने चालना मिळत आहे.

अवकाश स्थित संसाधनांच्या साह्याने पृथ्वीवरील शेतजमिनीच्या मोठ्या भूभागाचे एकाच वेळी व अनेकवेळा वारंवार माहिती गोळा करणे, संगणकीय प्रणाली व कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाद्वारे त्या माहितीचे रूपांतर पीक परिस्थितीचे अचूक वेळी, अचूक निदान करणे व त्याद्वारे योग्य वेळी शेतीमध्ये आवश्यक त्या प्रक्रियेचे नियोजन करणे तसेच त्यास क्लाउड, संवेदके, इंटरनेट ऑफ थिंग्स यंत्रमानव तंत्रज्ञानाची जोड देऊन शेतीमधील विविध प्रक्रिया स्वायत्तपणे राबविणे शक्य आहे.

अशा प्रकारे केलेल्या क्रियेद्वारे पिकास योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य प्रमाणात व योग्य गुणवत्तेच्या निविष्ठा देणे शक्य होईल. त्यामुळे शेती अर्थातच उत्पादक, किफायतशीर, कार्यक्षम, आकर्षक व शाश्‍वत होण्यास मदत होईल.

अर्थातच, कृषी प्रणाली ही इतर कोणत्याही प्रणालीच्या तुलनेत वैविध्यपूर्ण व क्लिष्ट असल्याने आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे अवकाशातून शेती करण्याचे तंत्रज्ञान पूर्णत्वास नेणे आव्हानात्मक आहे. पण अशक्य नाही. या दिशेने संशोधन आधारित तंत्रज्ञान विकसित करण्याचे कार्य काही विद्यापीठ व संशोधन संस्थांनी हाती घेतले आहे.

(लेखक महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर येथे संशोधन संचालक म्हणून कार्यरत आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com