Narendra Modi : आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा महायज्ञ : पंतप्रधान मोदी

Government Medical College : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात दुरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) पार पडला.
Medical College inauguration
Medical College inauguration Agrowon
Published on
Updated on

Jalna News : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी करणे हा याचा हेतू नसून, लाखो लोकांच्या जीवनात आनंद कायम ठेवून त्यांचे आरोग्य अबाधित ठेवण्याचा हा महायज्ञ, असल्याचे प्रतिपादन नरेंद्र मोदी यांनी केले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उद्घाटनाचा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवनात दुरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी (ता. ९) पार पडला. याप्रसंगी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री जगतप्रकाश नड्डा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, आरोग्य व कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती अनुप्रिया पटेल, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, मुख्य सचिव सुजाता सौनिक यांची दुरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थिती होती.

Medical College inauguration
Narendra Modi and Rahul Gandhi : निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान मोदी वाशीममध्ये तर राहुल गांधी कोल्हापुरमध्ये दाखल

तर आमदार कैलास गोरंट्याल, आमदार राजेश टोपे, माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री अर्जूनराव खोतकर, जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, अपर जिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर चौधरी यांची यावेळी प्रत्यक्ष उपस्थिती होती.

Medical College inauguration
PM Narendra Modi : काँग्रेस लूट आणि फसवणुकीचे संपूर्ण पॅकेज; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ठाण्यातून काँग्रेसवर हल्लाबोल

पंतप्रधान मोदी म्हणाले, की महाराष्ट्रात एकाच वेळी जालना, हिंगोली, बुलढाणा, गडचिरोली, वाशीम, भंडारा, अमरावती, मुंबई, नाशिक आणि अंबरनाथ (ठाणे) या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात होत आहे. यामुळे युवकांना नवीन संधी उपलब्ध झाली आहे. यामुळे आता सुमारे ९०० विद्यार्थ्यांच्या वैद्यकीय शिक्षण घेण्याच्या इच्छांना उभारी मिळण्यास मदत होणार, असल्याचे ही पंतप्रधान यांनी सांगितले.

ॲग्रो विशेष

मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले, की महाराष्ट्रात एकाच वेळी १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची सुरुवात होण्याचा विक्रम आज घडत आहे. उपमुख्यमंत्री श्री फडणवीस म्हणाले, की हा महाराष्ट्रासाठी गौरवाचा व आरोग्य शिक्षण सुविधेसाठी मोलाचा दिवस आहे. नागपूर येथील मिहान प्रकल्पामुळे विविध रोजगारांच्या संधी मिळत, असल्याचे त्यांनी सांगितले. वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव दिनेश वाघमारे यांनी आभार मानले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com