Chhatrapati Sambhajinagar: आतापर्यंत केसर आंबा पिकास अनुकूल वातावरण आहे. सद्यःस्थितीत एकाएका तुऱ्यावर ७-८ फळांची सेटिंग झालेली दिसत आहे. यामधील फळांची विरळणी करून तीन-चार फळे ठेवल्यास गुणवत्तापूर्ण, चांगल्या आकाराची फळे मिळून चांगले दर हमखास मिळण्यास मदत होते, असे प्रतिपादन हिमायतबाग केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे प्रमुख शास्रज्ञ डॉ. संजय पाटील यांनी केले..कृषी विभाग व केसर आंबा गुणवत्ता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने धनगाव ( ता. पैठण) येथे मंगळवारी ( ता.१७) आयोजित शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे सहयोगी संचालक डॉ. सूर्यकांत पवार.Kesar Mango Farming : लवकरच केसर आंबा गुणवत्ता केंद्राचे बळकटीकरण.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रकाश देशमुख, तालुका कृषी अधिकारी विकास पाटील, जि प सदस्य मनोज पेरे,आंबा बागायतदार शेतकरी तथा कृषिभूषण पांडुरंग इनामे, विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कारप्राप्त वसंत कातबने आदींची उपस्थिती होती..यावेळी केसर आंबा बागेस दिलेल्या शिवार भेटीप्रसंगी डॉ पाटील म्हणाले, यावर्षी आंबा फळांची सेटिंग चांगली झालेली आहे. प्रत्येक तुऱ्यास फळे आलेली आहेत. ही सर्व फळे ठेवल्यास फळांचा आकार लहान राहील, फळे एकमेकांना घासून त्यावर डाग पडतील, अशा डागाळलेल्या फळांकडे ग्राहक आकर्षित होणार नाही तसेच अशा फळांना बाजारपेठेत अपेक्षित दर मिळणार नाही ..हे टाळण्यासाठी आताच फळांची विरळणी केल्यास आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरणार आहे. यावेळी विद्यापीठ युवा कृषी पुरस्कार प्राप्त शेतकरी योगेश कातबने,सहायक कृषी अधिकारी चंद्रकांत कळसकर,अशोक पठाडे,राजेश सरोदे, अशोक वाघचौरे ,स्वप्नील बोबडे आदी उपस्थित होते..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.