Rabi Irrigation : मालखेड तलावातून मिळणार नाही गव्हाला पाणी

Agriculture Irrigation : मालखेड तलाव यावर्षी पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पीक असलेल्या गव्हाला पाणीपुरवठा करण्यास पाटबंधारे विभागाने असमर्थता दाखविली. यामुळे रब्बी पिकांच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चांगलाच रोष आहे.
Rabi Season
Rabi Seasonagrowon
Published on
Updated on

Amravati News : मालखेड तलाव यावर्षी पूर्णपणे भरला नाही. त्यामुळे रब्बी पीक असलेल्या गव्हाला पाणीपुरवठा करण्यास पाटबंधारे विभागाने असमर्थता दाखविली. यामुळे रब्बी पिकांच्या तयारीत असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चांगलाच रोष आहे.

उशिराने आलेल्या पावसाने कुठे कमी तर कुठे जास्त हजेरी लावली. यामुळे मालखेड तलाव १०० टक्के भरू शकला नाही. केवळ ८६ टक्क्यांपर्यंत पाणी या तलावात आले होते. त्यात शहराच्या पाणीपुरवठा व बाष्पीभवन, यामुळे सध्या तलावात ७० टक्केच जलसाठा आहे.

Rabi Season
Maharashtra Drought : उर्वरित महाराष्ट्र काय हिरवा आहे काय?

त्यात रब्बीमधील हरभरा आणि गव्हाला पाणीपुरवठा करणे अशक्य असल्याची पाटबंधारे विभागाची माहिती आहे. हरभऱ्याला पाणी न घेतल्यास मायनर चारपर्यंत पाणीपुरवठा होऊ शकतो, असा अंदाज आहे. परंतु महत्त्वाचे म्हणजे या कार्यालयात गेले कित्येक दिवसांपासून नियमित व जबाबदार अधिकारीच राहत नसल्यामुळे तालुक्यातील पाणीपुरवठ्याच्या कामाचे नियोजन पूर्णतः खोळंबल्याचे चित्र आहे.

अनेक वर्षांपासून येथील पाटबंधारे कार्यालयाला नियमित अधिकारी नाही. सद्यःस्थितीत वरुड येथील कार्यकारी अभियंता हे अमरावती व चांदूररेल्वेचा प्रभार सांभाळत आहेत. त्यामुळे सर्व कामे अमरावती कार्यालयातूनच सुरू असल्याचीही माहिती आहे.

Rabi Season
Soybean Cotton MSP : ‘मोदी गॅरंटी योजने’ची राज्यात अंमलबजावणी करा

हरभऱ्याला तीन पाणी देणार

रब्बी पिकांमध्ये काही भागात हरभऱ्याचे पीक घेतली जाते. त्याला पाणी कमी लागते. त्यामुळे हरभऱ्याला तीन वेळा पाणी देता येईल, असे कार्यालयाचे मत आहे. परंतु सध्या हरभऱ्याची लागवड सुरू आहे. कार्यालयाकडून पाणीपुरवठ्याचे कुठलेच नियोजन नाही. पाणी सोडले तरी त्याला डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

...तर २०० हेक्टर शेतीला पाणीपुरवठा

गव्हासाठी नियोजन केल्यास मायनर चारपर्यंत एकूण पाच ते सहा पाणी विभागाकडून देता येऊ शकते. तालुक्यात एकूण सहा मायनर आहे. दरवर्षी ३०० हेक्टरमध्ये गव्हाची लागवड होते. त्यात धानोरा म्हाली, सोनगाव, चांदूर भाग एक, शिवणी, मांजरखेड दानापूर या गावांचा समावेश आहे. म्हणजेच नियोजन केल्यास २०० हेक्टर शेतीला पाणीपुरवठा होऊ शकतो.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com