Onion Producer : कांदा उत्पादकांचा उत्पादन खर्चही निघेना

राज्यभरात लेट खरीप कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक विभागातून होत आहे. त्या खालोखाल सोलापूर बाजार समितीमध्ये आवक होत आहे.
Onion Producer
Onion ProducerAgrowon
Published on
Updated on

Nashik Onion Rate News : यंदा लेट खरीप कांद्याची फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून बाजारात मोठी आवक (Onion Arrival) होत आहे. एकीकडे आवक वाढ, घटलेली मागणी व कमी झालेला पुरवठा या प्रमुख कारणाने मोठ्या प्रमाणावर दरात घसरण झाल्याची स्थिती आहे.

परिणामी, सध्या कांदा उत्पादकांचे (Onion) अर्थकारण कोलमडले आहे. प्रतिक्विंटल ६५० ते ७०० रुपये दर (onion Rate) मिळत आहेत. त्यामुळे अनेकांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याची स्थिती आहे.

राज्यभरात लेट खरीप कांद्याची सर्वाधिक आवक नाशिक विभागातून होत आहे. त्या खालोखाल सोलापूर बाजार समितीमध्ये आवक होत आहे. मात्र फेब्रुवारीत दरात मोठी घसरण झाली आहे. सरासरी ४०० रुपयांचा फटका प्रतिक्विंटलमागे सोसावा लागत आहे.

लासलगाव बाजार समितीत सध्या ५०० रुपयांनी तर पिंपळगाव बसवंत येथे ४०० रुपयांची घसरण आहे. काही बाजार समित्यांमध्ये आवकेनुसर दरात किरकोळ सुधारणा होते. मात्र ती असून नसल्यासारखी आहे.

यंदा उत्पादनखर्च वाढ व मजूरटंचाई अशी दोन प्रमुख आव्हाने होती. त्यातच पीक संरक्षण खर्चाची भर पडली. त्यामुळे कांदा काढणीपश्‍चात दर साधतील, अशी अपेक्षा असताना दरात झालेली मोठी घसरण अडचणींची ठरत आहे. नफा तर दूरच मात्र उत्पादन खर्च वसूल करणे दुरापास्त झाले आहे.

Onion Producer
Onion Market : ‘नाफेड’मार्फत कांदा खरेदी सुरू करावी

प्रमुख बाजार समित्यांमधील स्थिती

बाजार समिती...आवक...किमान...कमाल...सरासरी (बुधवारपर्यंत, ता.१५)

लासलगाव...३११५६...४००...११४०...७००

विंचूर उपबाजार (लासलगाव)...२२,०८५...४००...१,१५२...७००

पिंपळगाव बसवंत...२८,२८२...३००...१,२२९...७००

येवला...२५,२६९...२००...९१२...६००

येवला (आंदरसूल)...१४,९३४...२००...७३९...६५०

मालेगाव (मुंगसे)...१३,०००...४००...१,१००...८००

सिन्नर...१४,९००...२००...१,०००...७००

चांदवड...१६,१८६ ...३००...१,०७२...६५०

मनमाड...१६,१३६...३००...९६०...७५०

देवळा...७,६१० ...१४०...९४०...७५०

उमराणे...१५,५००...५१०...१,१००...८५०

नामपूर...११,०९३...१००...९७५...७५०

सटाणा...९,१५०...१७५...१०००...७००

निर्यात, देशांतर्गत मागणी घटली

लाल कांद्याच्या सोबतीने नगर, पुणे भागात चाकण येथून किरकोळ उन्हाळ कांदा निघू लागला आहे. त्यामुळे लेट खरीप कांद्याचे दर कमी आहेत. त्यामुळे देशांतर्गत मागणी वाढून दरवाढीची आशा होती. मात्र मागणी व पुरवठा मोठ्या प्रमाणावर अस्थिर आहे.

बांगलादेशमध्ये पश्चिम बंगालमधील सुखसागर भागांतील काही माल जात आहे. अफगाणिस्तान, इराण भागात निर्यात कमी होत आहे. प्रमुख आयातदार देशात स्थानिक माल काढणी होत आहे. देशात गुजरातमधील भावनगर पट्ट्यात आवक अधिक आहे.

यंदा पिकात मजुरी, खत, औषधांचा खर्च वाढला आहे. एकरी दीडपट खर्च वाढून तो ८० हजारांवर गेला आहे. एकरी सरासरी ९० क्विंटलवर उत्पादन मिळत आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वसूल होत नसल्याने कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. एकीकडे भांडवल नाही, बँका कर्ज देत नाहीत आणि कांद्याला त्यात भाव नाही. सरकार फक्त घोषणेपुरते उरले आहे.
जनार्दन कमोदकर, कांदा उत्पादक, कोळगाव, ता. येवला
तुलनेत कर्नाटकमधील आवक कमी आहे. मात्र तेथे सोलापूर, नगर या भागातून माल जात आहे. त्यामुळे नाशिक पट्ट्यातील लेट खरीप कांद्याला अपेक्षित उठाव नसल्याने दरात कोंडी झाली आहे, अशी माहिती लासलगाव (जि. नाशिक) येथील कांदा निर्यातदार मनोज जैन यांनी दिली.लासलगाव बाजार समिती व उपबाजारात ५० हजार क्विंटलवर आवक आहे. लेट खरीप कांद्याला रब्बी कांद्याच्या तुलनेत टिकवणक्षमता कमी असल्याने विक्री निरंतर सुरू आहे. खरीप आणि लेट खरीप एकत्र आला. बांगलादेश, श्रीलंका, नेपाळ, पाकिस्तान या पारंपरिक आयातदार देशात पुरवठा कमी झाला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींसह दराचा फटका बसला आहे.
नरेंद्र वाढवणे, सचिव, लासलगाव बाजार समिती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com