Gokul Dudh Sangh : गोकुळच्या टँकरमधून दुधाची चोरी, वारंवार घटनांमुळे शेतकरी हतबल

Gokul Milk News : गोकुळमधील टँकरमधून होणाऱ्या दुधाची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. टेम्पोचालकांकडून दूध चोरीचा प्रकार उघडकीस
Gokul Dudh Sangh
Gokul Dudh SanghAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News : कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वात मोठा असलेल्या गोकुळ दूध संघाबाबतीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गोकुळमधील टँकरमधून होणाऱ्या दुधाची चोरी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे. अंबपवाडी (ता. हातकणंगले) मार्गावरील टेम्पोचालकांकडून दूध चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे.

रोज दहा लिटर दूध कॅनमधून काढून त्यामध्ये पाणी मिसळत असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले आहे. संबंधित ठेकेदारांवर कारवाई करण्यात आली असून दहा हजार रुपये दंड करण्यात आल्याची माहिती संघ व्यवस्थापनाने दिली.

अंबपवाडी दूध वाहतूक मार्गावर सागर डोंगरे हे ठेकेदार असून, त्यांच्या टेम्पोचा चालक शुभम शिवाजी निर्मळे (अंबपवाडी) याने हनुमान दूध संस्थेच्या म्हैस दूध कॅनमधून दूध काढून ते शिवनेरी दूध संस्थेच्या कॅनमध्ये ओतल्याचे ज्ञानेश्वरी दूध संस्थेचे सचिव शुभम खाडे यांनी पाहिले.

खाडे यांच्यासह संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी त्याच्याकडे चौकशी असता ५ ते १० लिटर पाण्याचे कॅन गाडीत आढळले. यावरून तो दूध काढून पाणी मिसळत असल्याचा अंदाज वर्तविला आहे. दरम्यान मागच्या दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार समोर आला होता. यामुळे दूध उत्पादकांचे नुकसान होऊ नये यासाठी गोकुळ प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.

Gokul Dudh Sangh
Gokul Dudh Sangh : 'गोकुळ'कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट, १०१ कोटी ३४ लाखांचा दिला फरक

दोन महिन्यांपूर्वी असाच प्रकार

गोकुळ दूध संघाचे कोल्हापूर जिल्ह्यात दूध संकलन करण्यासाठी टेम्पो फिरत असतात. दरम्यान टेम्पोमधील कौलगे (ता. कागल) येथील एका दूध संस्थेला दूध चोरी होत असल्याची शंका होती. यावरून दूध उत्पादक व संस्था प्रतिनिधी यांनी रंगेहाथ पकडली.

टेम्पो निर्जन माळरानात थांबवून त्यातील दूध एका कॅनमधून किटलीने काढले जात होते. दरम्यान टेम्पो चालक व क्लीनर मात्र पसार झाले आहे. या प्रकाराचा दूध संघाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा केला. कौलगे येथील दूध संस्थांच्या दुधाची प्रत सातत्याने कमी येत होती.

यामुळे दूध संस्थेला याचा मोठा आर्थिक फटका संस्थेला बसत होता. उत्पादक प्रामाणिकपणे दूध पुरवठा करतात, तरीही असे का घडते, या विचाराने शंका येऊन टेम्पोवर पाळत ठेवली होती. त्यावेळी कौलगे येथील दोघांना खडकेवाडा येथील भैरी मंदिरानजीक टेम्पो थांबून त्यातील कॅनमधून दूध काढले जात असल्याचे निदर्शनास आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com