Chana Procurement : हमीभाव केंद्रावरील रांगेमधील वाहनातील हरभरा पिशव्यांची चोरी

परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी (ता.परभणी) येथे महाएफपीसी अंतर्गत एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्रावर गुरुवार (ता.२३) पासून नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी सुरु झाली आहे.
Chana
Chana Agrowon

Parbhani News : किमान आधारभूत किंमत (MSP) खरेदी योजने अंतर्गंत नाफेडच्या वतीने महाएफपीसी अंतर्गंत रहाटी (ता.परभणी) येथील केंद्रावरील रांगेमधील एका वाहनातील हरभरा भरलेल्या पिशव्याची चोरी झाली. ही घटना सोमवारी (ता.२७) रात्री घडली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.

परभणी वसमत राष्ट्रीय महामार्गावरील रहाटी (ता.परभणी) येथे महाएफपीसी अंतर्गत एका शेतकरी उत्पादक कंपनीच्या केंद्रावर गुरुवार (ता.२३) पासून नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून हमीभावाने हरभरा खरेदी सुरु झाली आहे.

Chana
Chana Procurement : माटरगाव येथे शासकीय हमीभाव योजनेअंतर्गत हरभरा खरेदीस प्रारंभ

या केंद्रावर मोजमापासाठी हरभरा आणण्यासाठी शेतकऱ्यांना आदल्या दिवशी संध्याकाळी एसएमएस पाठविले जात आहेत. सोमवारी (ता.२७) एसएमएस प्राप्त झाल्यानंतर आर्वी येथील एक शेतकरी त्याच रात्री एका वाहनात हरभऱ्याच्या पिशव्या घेऊन या केंद्रावर आले.

परंतु सोमवारी (ता. २७) रात्री रांगेतील एका वाहनातील १४ पिशव्या चोरीला गेल्याचा प्रकार मंगळवारी (ता.२८) सकाळी उघडकीस आला. या प्रकरणी ताडकळस (ता.पूर्णा) पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

Chana
Chana Procurement : हमीभावाने ६ हजार ५२६ क्विंटल हरभऱ्याची खरेदी

राज्यात नाफेडकडून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहेत. ऑनलाईन नोंदणी करून शेतकरी हरभरा विक्रीसाठी नाफेडच्या केंद्रावर घेऊन जातात. नोंदणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना मोबाईल मेसेज येतो. त्यानंतर या केंद्रावर हरभऱ्याची खरेदी केली जाते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com