Maharashtra Rural Story : गावपुढाऱ्यांची गावगुंडी

चौकशीमध्ये गावातल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या जमिनी गावाच्या जवळ असताना सुखदेवची एक एकर असलेली जमीन स्मशानभूमीसाठी घ्यायची असा डाव सरपंचाने आखल्याचे स्पष्ट झाले.
Rural Story
Rural Story Agrowon

Gavpudhari : एका लहान गावात सुखदेव नावाचा गरीब अल्पसंख्याक शेतकरी त्याच्या पत्नीसोबत राहत होता. सुखदेवची गावठाणाच्या जवळच एक एकर जमीन होती. गावात एक स्मशानभूमी होती.

गावासाठी स्मशानभूमीसाठी जमीन कमी पडायला लागली म्हणून सर्व गावकऱ्यांनी दुसऱ्या स्मशानभूमीसाठी जमीन शोधण्याची धडपड सुरू केली.

गावचे सरपंच, गावातील काही पुढारी यांनी जाणीवपूर्वक सुखदेवची जमीन गावठाणाच्या जवळ असल्यामुळे तसेच सुखदेव हा अल्पसंख्याक असल्यामुळे स्मशानभूमीसाठी त्याची एक एकर जागा घेण्याचे ठरविले.

सुखदेवला न विचारता सरपंच व गावातल्या पुढाऱ्यांनी घाई गडबडीने ग्रामपंचायतीची बैठक घेऊन स्मशानभूमीसाठी ठराव मंजूर केला आणि तसा अर्ज कलेक्टर यांना देऊन तातडीने सुखदेवची जमीन स्मशानभूमीसाठी संपादित करावी अशी मागणी कलेक्टरांना केली.

Rural Story
Jal Jeevan Mission : ‘जलजीवन’च्या कामाची पूर्तता करणारे गाव हरघर जल घोषित

सुखदेव ने सुद्धा ‘‘गावातल्या पुढाऱ्यांनी मी गरीब माणूस आहे म्हणून माझी जमीन बहुमताच्या जोरावर स्मशानभूमीसाठी घेण्याचे ठरविले आहे,’’ अशी लेखी तक्रार कलेक्टरांकडे केली. कलेक्टरांनी या अर्जाची शहानिशा करण्याचे ठरविले.

त्यांच्या वतीने उपजिल्हाधिकारी स्वत: या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समक्ष गावात गेले.

चौकशीमध्ये गावातल्या मोठमोठ्या पुढाऱ्यांच्या जमिनी गावाच्या जवळ असताना सुखदेवची एक एकर असलेली जमीन स्मशानभूमीसाठी घ्यायची असा डाव सरपंचाने आखल्याचे स्पष्ट झाले.

एवढेच नाहीतर केवळ सुखदेव हा गावातला एकटाच शेतकरी अल्पसंख्याक असल्यामुळे जाणीवपूर्वक सुखदेवचीच जमीन स्मशानभूमीसाठी घेण्याचा डाव सरपंचाने व गावातील पुढाऱ्यांनी आखला असल्याचे निदर्शनास आले.

Rural Story
Eknath Shinde : शेतकरी केंद्रबिंदू मानून राज्यात कारभार सुरू

प्रकरणाची शहानिशा करुन गावातील सरपंच व गाव पुढारी यांची गावगुंडी उधळून लावली व गरीब सुखदेवला न्याय मिळाला! सांगायचे तात्पर्य म्हणजे जमिनीच्या बाबतीत ग्रामीण भागात स्थानिक पुढाऱ्यांकडून प्रचंड गावगुंडी केली जात असल्याचे निदर्शनास येत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com