KCC Scheme : भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) योजनेबाबत बँकांना लवकरच सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी करणार आहे. शेतकऱ्यांना कर्ज घेताना अडचणी येऊ नयेत आणि त्यांना वेळेवर पैसे मिळावेत, यासाठी या योजनेसाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी नुकतेच सांगितले. या निर्णयाचा थेट फायदा शेतकरी, मजुरांना होईल आणि त्यांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे..या प्रस्तावित मार्गदर्शक तत्त्वांमध्ये पीक हंगामाचे मानकीकरण, किसान क्रेडिट कार्डची वैधता पाच वर्षांवरून सहा वर्षांपर्यंत वाढवणे, प्रत्येक पीक हंगामासाठी कर्जाचे प्रमाण ठरविण्याच्या पद्धतीशी (स्केल ऑफ फायनान्स) पैसे काढण्याची कमाल मर्यादा सुसंगत करणे आदी गोष्टींचा समावेश असेल..Kisan Credit Card : देशात सर्वाधिक किसान क्रेडीट कार्ड महाराष्ट्रात; वित्त मंत्रालयाचा लोकसभेत दावा.या संदर्भातील मसुदा मार्गदर्शक तत्त्वे लवकरच जारी करण्यात येतील, असे गर्व्हनर मल्होत्रा यांनी म्हटले आहे. ‘आरबीआय’कडून केसीसी योजनेचा व्यापक आढावा घेण्यात आला आहे. जेणेकरून या योजनेची व्याप्ती वाढेल. कार्यपद्धती अधिक सुलभ आणि नव्याने निर्माण होणाऱ्या गरजांची पूर्तता होईल, असे त्यांनी नमूद केले आहे..Kisan Credit Card: शेतकऱ्यांना मोठा दिलासा, 'किसान क्रेडिट कार्ड'ची वैधता ६ वर्षांपर्यंत वाढणार .किसान क्रेडिट कार्ड योजना काय आहे?सरकारने किसान क्रेडिट कार्ड योजना १९९८ मध्ये सुरू केली होती. शेतीच्या विविध टप्प्यांवर शेतकऱ्यांच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेच्या माध्यमातून पीक लागवड, काढणीपश्चात कामे, विपणनासाठी कर्ज, घरगुती गरज, शेती मालमत्तेसाठी खेळते भांडवल आणि शेतीशी संलग्न व्यवसायासाठी गुंतवणूक कर्जाच्या स्वरूपात आर्थिक साह्य पुरवले जाते..शेतकऱ्यांना वेळेवर आर्थिक साहाय्य देऊन शेती क्षेत्राच्या विविध कर्ज गरजांची पूर्तता करण्यासाठी राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेने (नाबार्ड) विकसित केलेल्या मॉडेलवर ही योजना आधारित आहे. एसबीआयच्या माहितीनुसार, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) अंतर्गत २ लाख रुपयांपर्यंतच्या कर्ज मर्यादेसाठी शेतकऱ्यांसाठी तारण शुल्क माफ आहे. टाय-अप व्यवस्थेच्या बाबतीत ३ लाख रुपयांपर्यंतच्या कर्जासाठी तारण शुल्क माफ सवलत दिली जाते..‘या’ योजनेसाठी कोण पात्र?शेतकरी- वैयक्तिक/संयुक्त कर्जदार ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीची जमीन आहे आणि शेती करणारे, खंडाने शेती करणारे शेतकरी, तोंडी करारावर शेती करणारे आणि वाटेकरी शेतकरी, शेतकऱ्यांचे स्वयंसाह्य गट, ज्यात खंडाने शेती करणारे, वाटेकरी शेतकरी आदींचा समावेश आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.