SC Demonetization Judgement : नोटाबंदीच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाने दिला निकाल

केंद्रात सत्तेत आल्यानंतर २०१६ मध्ये नोटाबंदी निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.
SC Demonetization Judgement
SC Demonetization JudgementAgrowon
Published on
Updated on

केंद्रात सत्तेत आल्यानंतर मोदी सरकारने (Modi Government) २०१६ मध्ये नोटाबंदी (Demonetization) निर्णय घेतला होता. मात्र त्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या ५८ याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. मोदी सरकारच्या याच नोटाबंदीच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी (ता.१) निर्णय दिला आहे. नोटाबंदीचा निर्णय वैधच आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने निर्णय (SC Demonetization Judgement) देताना म्हंटले आहे. दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने ७ डिसेंबरला निकाल राखून ठेवला होता

SC Demonetization Judgement
Soybean Rate : आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन वाढले; देशात काय स्थिती होती?

निकाल काय दिला ?

न्यायमूर्ती बीआर गोसावी यांनी नोटाबंदी बाबतच्या निकालाचे वाचन केले. नोटाबंदी आणि त्याच्या उद्देशात संबंध आहे. ते उद्देश पूर्ण झाले की नाही हा स्वतंत्र मुद्दा आहे, नोटा बदलण्यासाठी ५२ आठवडे दिले होते. तो कालावधी आवास्तव होता, असे म्हणता येत नाही. असं निरीक्षणही न्यायालयाने यावेळी नोंदवले. केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ रोजी घेतलेला निर्णय घटनाबाह्य नाही. हा निर्णय घेताना राबवण्यात आलेल्या निर्णय प्रक्रियेच्या आधारावर हा निर्णय अवैध असल्याचे म्हणता येत नाही. आरबीआय कायद्यातील कलम २६ (२) ही देखील असंवैधानिक ठरवता येत नाही, असे सर्वांच्च न्यायालयाने म्हंटले आहे.

नोटाबंदीमुळे शेती क्षेत्रासह सगळ्याच क्षेत्रांना मोठा फटका बसल्याचे अभ्यासकांचे मत होते. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोटाबंदीच्या निर्णयाविरुद्ध याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रात्री ८ वाजता नोटबंदी केली. या निर्णयात ५०० आणि १००० च्या नोटा बंद करण्यात आल्या. त्यानंतर देशभरात जनतेला नोटा बदलून घेण्यासाठी रांगेत उभे राहावे लागले. त्या रांगेत अनेकांचा मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले होते.

तसेच नोटाबंदीच्या दरम्यान ग्रामीण अर्थव्यवस्थेला फटका बसला होता. ऐन रब्बी हंगामात शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा खरेदी करण्यात अडचणी निर्माण झाल्याचाही मुद्दा विरोधकांनी लावून धरला होता. परिणामी नोटाबंदीला विरोधकांकडून विरोध करण्यात आला. तसेच मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात सर्वाच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com