Revenue Department Recovery : संपाचा महसूल वसुलीवरही परिणाम

मार्चअखेरीस केवळ दहा दिवस उरले आहेत. संप सुरू असल्याने ती वसुली होईल की नाही, असे चित्र आहे.
Old Pension Scheme
Old Pension SchemeAgrowon
Published on
Updated on

Jalgaon News : जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) राज्य कर्मचाऱ्यांना लागू करावी, या मागणीसाठी गेल्या १४ मार्चपासून शासकीय कर्मचाऱ्यांनी संप सुरू केला होता. तो काल दुपारी (ता. २०) सरकार सोबत झालेल्या बैठकीनंतर मागे घेण्यात आला.

यात जिल्ह्यातील महसूल विभागाचे अकराशेवर कर्मचारी सहभागी झाले होते. मार्च महिना वर्षभरातील महसूल वसुलीचा असतो. जिल्ह्याची आतापर्यंत केवळ ४३ कोटींची वसुली बाकी आहे.

मार्चअखेरीस केवळ दहा दिवस उरले आहेत. संप सुरू असल्याने ती वसुली होईल की नाही, असे चित्र आहे. संपामुळे कोशागार विभागात तिनशेच्यावर बिलांच्या फाइल पडून होत्या. संपामुळे जिल्हा प्रशासनाचे महसूल वसुलीचे गणित कोलमडणार आहे.

Old Pension Scheme
Farmer Loan Waive : बारा हजार शेतकऱ्यांच्या खात्यात ४० कोटी जमा

१ मार्चला जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन

महसूल वसुली पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या होत्या. पंतप्रधान ग्रामीण योजनेची प्रलंबित प्रकरणे त्वरित पूर्ण करा, गौणखजिन व जमीन महसूलबाबत दिलेले लक्षांक अधिकाऱ्यांना वेळेत पूर्ण करण्यास सांगितले होते.

मात्र, संप काळात वसुली ठप्प होती. त्यामुळे मार्चअखेरची कामे कशी पूर्ण करावीत, असा प्रश्‍न अधिकाऱ्यांना पडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार सर्व संपकऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. तरी अजूनही कर्मचारी कामावर येण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.

जमीन महसूल लक्षांक व झालेली वसुली अशी

तालुका - लक्षांक वसुली - टक्के

बोदवड- १ कोटी ५० लाख ३२ लाख ४७ हजार- २१.६५ टक्के

जळगाव - १९ कोटी ९० लाख ५ कोटी ५५ लाख - २७.९२

भडगाव- २ कोटी ५३ लाख ८४ हजार - २६.९२

चोपडा - ४ कोटी ५० लाख १ कोटी ५७ लाख- ३४.९८

अमळनेर - ३ कोटी ५० लाख १ कोटी २८ लाख - ३६.६३

पारोळा- २ कोटी २५ लाख ८२ लाख ८६ हजार - ३६.८३

धरणगाव- २ कोटी २५ लाख ९७ लाख २० हजार- ४३.२०

चाळीसगाव- ७ कोटी १ कोटी ६० लाख - २२.९६

पाचोरा- ४ कोटी १ कोटी ९५ लाख- ४८.९८

मुक्ताईनगर - २ कोटी ६० लाख १ कोटी ५४ लाख- ५९.२६

यावल - ४ कोटी ५० लाख १ कोटी ८२ लाख- ४०.५२

भुसावळ- ५ कोटी ७५ लाख १ कोटी ६९ लाख- २९.५४

रावेर- ४ कोटी ५० लाख २ कोटी २४ लाख- ४९.८७

जामनेर- ४ कोटी ४ कोटी ३ लाख- १००.६१

एरंडोल - २ कोटी १ कोटी २० लाख- ६०.४८

एकूण - ७० कोटी २५ लाख २७ कोटी १८ लाख -३८.६९ टक्के

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com