Pune News: तृणधान्य व पौष्टिक धान्य क्षेत्र घटल्यामुळे राज्याने अन्न सुरक्षा गमावली आहे. तर योग्य भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांना एका वर्षात १६ हजार कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे आता ग्रामीण उपजीविकेबाबत एकात्मिक शेतीचे प्रभावी धोरण स्वीकारावे लागेल, असा निष्कर्ष एका अहवालातून काढण्यात आला आहे..‘यशदा’ येथे आयोजिलेल्या महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषदेत मंगळवारी (ता.२८) ‘अफार्म’चे अध्यक्ष डॉ. व्यंकट मायंदे यांनी ‘महाराष्ट्र उपजीविका क्षेत्र-२०२५’ या अभ्यास अहवालाचे सादरीकरण केले. ‘राज्याचा ८० टक्के भाग कोरडवाहू असून ७९.५ टक्के शेतकरी अल्प व अत्यल्प भूधारक आहेत. ५५ टक्के जनता ग्रामीण असून त्यातील ७५ टक्के जनता केवळ शेतीवर अवलंबून आहेत. .Agriculture: शेती हा भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा; कडधान्यांची हमीभावाने १०० टक्के खरेदी होणार- कृषिमंत्री चौहान.या स्थितीत तृणधान्य व पौष्टिक धान्याखालील क्षेत्र ७.५ दशलक्ष हेक्टरवरून आता ६.३ दशलक्ष हेक्टरपर्यंत घटले आहे. राज्याचे दरडोई अन्नधान्य उत्पादन १९७० च्या दशकाच्या आधीच्या तुलनेत आता ४५ टक्क्यांनी घटले आहे. परिणामी, अन्न सुरक्षेबाबत राज्य आता परावलंबी झाले आहे,’ असे डॉ. मायंदे यांनी नमूद केले..कापूस, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पुरेसे उत्पन्न मिळत नाही. सोयाबीनची उत्पादकताही घटली आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांची उपजीविका साधने झपाट्याने घटत आहेत. त्यामुळे राज्याने आता एकात्मिक शेतीकडे जायला हवे. त्यासाठी उपलब्ध प्रारूपांचा (मॉडेल्स) तातडीने अवलंब आणि विस्तार करायला हवा. राज्याचे पशुधनदेखील दहा टक्क्यांनी घटले आहे. शेती परवडत नसल्याने शेतकरी आता शेळी-मेंढी पालनाकडे वळाले आहेत. सुदैवाने पशुधनाला शासनाने शेतीचा दर्जा दिला आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाला काही प्रमाणात सुलभता मिळेल, असे डॉ. मायंदे म्हणाले..AI In Agriculture : स्मार्ट शेतीसाठी २ हजार ५०० कोटी रुपयांचे सामंजस्य करार; एप्रिल २०२६ पासून प्रकल्प सुरु होणार.उपजीविका समस्यांबाबत अहवाल म्हणतो...शेतीला जोडून पशुपालन, मत्स्यशेती, जोडधंदे यावर भर दिला जावा.जंगले घटत असल्याने वनाधारित उपजीविकेच्या समस्या वाढतील.राज्यात मशागतीखालील जमीन ७.५ लाख हेक्टरने व निव्वळ पेऱ्याखालील जमीन साडेसात लाखाने घटली आहे..मातीची धूप वेगाने होते आहे. ३०७ दशलक्ष टन माती दरवर्षी वाहून जाते आहे.बागायती भागात सेंद्रिय कर्ब कमी होत जमीन क्षारता वाढतेय. त्यातून जमीन सुपीकता वेगाने घटते आहे.गोदावरी, भीमा, तापी, कृष्णा नद्यांच्या खोऱ्यातील पाण्याचे समान वाटप व्हावे. ५९ तालुक्यांमध्ये भूगर्भात पाणी राहिलेले नाही..९७ हजार पाणीसाठे असूनही राज्य तहानलेले आहे. पिण्यासाठी ग्रामीण भागात दरडोई ५५ लिटरऐवजी केवळ ४० लिटर पाणी मिळते आहे.वातावरण बदलामुळे ६८ टक्के भाग दुष्काळग्रस्त तर १२ टक्के भाग पूरग्रस्त झाला आहे. त्यामुळे राज्याचा एकूण ८० टक्के भाग आता हवामान बदलाच्या संकटाखाली.शिक्षणाचा दर्जा घसरला आहे. आरोग्य व पोषण चांगले नसल्यामुळे उपजीविकेत समस्या आलेली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.