
Sanagli Industrial News : सांगली जिल्ह्यातील १४ साखर कारखान्यांचा गाळप हंगाम (Sugarcane Crushing Season) सध्या आटोपला आहे. जिल्ह्यात १५ साखर कारखान्यांनी ८२ लाख २२ हजार ३१९ टन उसाचे गाळप करून ९२ लाख ५६५ हजार ७८२ क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या हंगामात साखरेचे उत्पादन घट होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात यंदाच्या हंगामात १० सहकारी आणि ५ खासगी अशा एकूण १५ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला. यंदाच्या हंगामात १ लाख २४ हजार हेक्टरवरील उसाचे गाळप झाले. जिल्ह्यातील १५ साखर कारखान्यांनी काटेकोर नियोजन करत संपूर्ण उसाचे गाळप केले.
जिल्ह्यातील सोनहिरा साखर कारखान्याचा गाळप हंगाम मंगळवारी (ता. २८) संपण्याची शक्यता आहे. १५ साखर कारखान्यांचा सरासरी ११.२६ टक्के साखर उतारा मिळाला.
गतवर्षी साखरेचा उतारा ११.६६ टक्के होता. यंदाच्या हंगामात श्रीपती शुगरने ७१ हजार ०२२ टन उसाचे गाळप करून ७३ हजार ८०० क्विंटल साखरेचे उत्पादन घेतले आहे.
सर्वांत कमी उसाचे गाळप आणि साखरेचे उत्पादन घेणारा हा कारखाना आहे. गाळपात सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याने आघाडी घेतली आहे. तर साखर उताऱ्यात कारंदवाडीचा सर्वोदय कारखाना अव्वल ठरला आहे.
यंदाच्या हंगामात उसाचे क्षेत्रात २२९२ हेक्टरने उसाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. एका बाजूला उसाच्या क्षेत्रात वाढ झाली असूनदेखील साखर उत्पादनात ८ लाख क्विंटलने घट झाली असल्याचे प्राथमिक चित्र आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.