Sowing Update : पाऊस लांबला, पेरा खोळंबला

Monsoon Update : जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत.
Rain Update
Rain UpdateAgrowon

Nagar News : जून महिना निम्मा सरत आला तरी पावसाने तोंड न दाखविल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. मॉन्सूनपूर्व पावसानेही हुलकावणी दिल्याने शेतातील ढेकळेही फुटली नाहीत. जूनमध्ये आतापर्यंत केवळ सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद आहे.

परिणामी, उडीद- मुगाच्या पेरणीवर परिणाम होणार आहे. आठ दिवसांत पेरणी न झाल्यास हा पेरा करता येणार नाही.

नगर जिल्ह्यात सुमारे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र असून, यंदा ६ लाख ३९ हजार ४३० हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी होण्याचा अंदाज आहे. त्यात प्रामुख्याने उडीद, तूर, मूग, बाजरी, मका, सोयाबीन, कापूस आदी पिके घेतली जातात.

प्रामुख्याने जिल्ह्याच्या दक्षिण भागात ही नगदी पिके घेतली जातात. कर्जत, जामखेड, पारनेर, नगर, पाथर्डी, शेवगाव हे तालुके खरिपाचे म्हणून ओळखले जातात. हा भाग दुष्काळी असल्याने त्यांची मदार पावसावरच असते.

उन्हाची तीव्रताही प्रचंड वाढली आहे. पावसाने हजेरी न लावल्याने खते, बियाण्यांच्या बाजारातील उलाढाल मंदावली आहे. दुकानदारांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. शेतकरी आणखी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.

Rain Update
Rain Update : कुठे अडलास रे पावसा? सांग ना...

पेरणी करण्यासाठी आवश्यक ओलावा जमिनीमध्ये नसल्याने पेरणीचा फायदा होणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्यांना सुरुवात केली नाही. जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी १९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सोयाबीन, सूर्यफूल, तूर, मूग, उडीद, मका या पिकांची पेरणी होते. गेल्या दोन वर्षांत तूर, सोयाबीनच्या उत्पादनात वाढ झाली आहे. नगर, पारनेर तालुक्यांत मुगाचे, तर कर्जत, जामखेड तालुक्यांत उडदाचे क्षेत्र मोठे असते. अलीकडे जामखेडला तुरीचे क्षेत्रही वाढत आहे. मात्र पाऊसच न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

टंचाईच्या झळा तीव्र होणार

पावसाळा लांबल्याने जिल्ह्यात आता टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. प्रशासनाकडे टँकरचे प्रस्ताव दाखल होऊ लागले आहेत.

सद्यःस्थितीत पारनेर तालुक्यातील बारा गावांना, संगमनेर तालुक्यात आठ, अकोले तालुक्यातील तीन, तर नगर तालुक्यातील चार गावांना टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. २७ गावे व १२० वाड्या-वस्त्यांवरील ४९ हजार ग्रामस्थांची तहान टँकर भागवत आहेत. पावसाळा आणखी लांबल्यास टँकरच्या संख्येत वाढ होईल.

Rain Update
Pune Rain Update : अठरा दिवसांत अवघे दोनच दिवस तुटपुंजा पाऊस

तालुकानिहाय झालेला

पाऊस (१ ते १३ जून)

नगर - ११.८

पारनेर- ८.४

श्रीगोंदा - ८.४

कर्जत - २.६

जामखेड - ३०.३

शेवगाव - १३.९

पाथर्डी - २३.६

नेवासे - २२.३

राहुरी - १६.५

संगमनेर - ६.०

अकोले - ८.३

कोपरगाव- ५.१

श्रीरामपूर - २.५

राहाता - ७.५

सरासरी - ११.९

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com