Pune Rain Update : धरणक्षेत्रांत पावसाचा जोर ओसरला

Dam Area Rain : पश्चिम पट्ट्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे भातखाचरे भरल्याने ते भरून वाहत आहेत. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत.
Rain Update Pune
Rain Update PuneAgrowon
Published on
Updated on

Pune News : मागील दोन दिवसांपासून धरणक्षेत्रांत पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. सध्या मुळशी, टेमघर, वडिवळे या धरणक्षेत्रांत आणि घाटमाथ्यावर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असून काही ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत.

पश्चिम पट्ट्यात धरणक्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे भातखाचरे भरल्याने ते भरून वाहत आहेत. त्यामुळे ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत. जवळपास एक महिना धरणक्षेत्रात कमी-अधिक स्वरूपात, तर काही वेळा मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे धरणांतील पाणीपातळी वेगाने वाढण्यास मदत झाली. आत्तापर्यंत झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील २६ धरणांत पाण्याची आवक सुरू झाल्याने बऱ्यापैकी पाणीसाठा झाला आहे.

मागील दोन महिन्यांत आलेल्या येव्यामुळे धरणांत तब्बल १८३.०३ टीएमसी म्हणजेच ९२ टक्के एवढा पाणीसाठा झाला आहे. तर धरणांची एकूण क्षमता १९८.३४ टीएमसी एवढी आहे. सोमवारी (ता.५) धरणक्षेत्रांत कमी-अधिक पाऊस झाल्यामुळे मंगळवारी (ता.६) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे धरणांत तब्बल २५.२९ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे.

Rain Update Pune
Vidarbha Rain : पश्‍चिम विदर्भात पावसाचा जोर ओसरला

यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, खडकवासला या धरणांत नव्याने १.७५ टीएमसी एवढी आवक झाली आहे. नीरा खोऱ्यातील धरणांत नव्याने ३.९५ टीएमसी, तर कुकडी खोऱ्यातील धरणांत नव्याने १.७२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. याशिवाय टेमघर, कळमोडी, आंध्रा, भाटघर ही धरणे शंभर टक्के भरली आहेत. इतर काही धरणांत ९० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा झाल्याने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. त्यामुळे नद्या दुथडी भरून वाहत आहेत.

गेले आठवडाभर जिल्ह्यातील ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, मुळशी आणि कुंडली अशा घाटमाथ्यांवर जोरदार पाऊस पडला. आता या भागात पावसाचा प्रभाव काहीसा कमी झाला आहे. मुळशीच्या घाटमाथ्यावर ८६ मिलिमीटर, वळवण ५३, तर लोणावळा ३९, शिरोटा ३५, कुंडली ३०, ठोकरवाडी २० मिलिमीटर पाऊस पडला.

Rain Update Pune
Pune Rain Update : धरण क्षेत्रातील मुसळधारेने १७ धरणे तुडूंब

उजनीच्या धरणक्षेत्रातही मागील काही दिवस पावसाने चांगलीच हुलकावणी दिली होती. परंतु नीरा आणि भीमा खोऱ्यामध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण तुडुंब भरले असून, भीमा नदीमध्ये तब्बल एक लाख २८ हजार २०५ क्युसेकने पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

मुठा खोऱ्यातील टेमघर धरणक्षेत्रात ३८ मिलिमीटर पाऊस पडला असून वरसगाव, पानशेत, खडकवासला धरणक्षेत्रात हलक्या सरी पडल्या. नीरा खोऱ्यातील वडिवळे धरणक्षेत्रात ३८ मिलिमीटर पाऊस पडला. तर पवना १२, कासारसाई १०, तर कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, नाझरे, वीर, भाटघर धरणक्षेत्रात हलक्या सरी कोसळल्या. कुकडी खोऱ्यातील वडज, पिंपळगाव जोगे, माणिकडोह, चिल्हेवाडी येथे तुरळक सरी, तर घोड, येडगाव, डिंभे धरण क्षेत्रात ढगाळ वातावरणाची स्थिती कायम होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com